Breaking News
Home / जरा हटके / सोनाली पाटीलचा पुण्यातील चाकण परिसरात अपघात जोरदार धडक बसल्याने जागीच पडली बेशुद्ध

सोनाली पाटीलचा पुण्यातील चाकण परिसरात अपघात जोरदार धडक बसल्याने जागीच पडली बेशुद्ध

मराठी बिग बॉसचा ३ रा सिजन सोनाली पाटील, विकास पाटील, मीनल शाह आणि विशाल निकम यांच्या मैत्रीमुळे विशेष गाजला होता. या शोमुळे प्रसिद्धी मिळालेल्या सोनालीच्या फॅनफॉलोअर्स मध्येही मोठी वाढ झाली होती. नुकताच सोनालीचा अपघात झाला असल्याची बातमी तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या अपघाताची बातमी समजताच विकास पाटील ने सोनालीची भेट घेतली होती. आणि लवकर बारी हो असे कॅप्शन देऊन त्याने तिच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये सोनालीच्या हाताला दुखापत झाली असल्याचे समोर आले होते. मात्र हा अपघात कसा झाला याबाबत नुकतीच तिने माहिती दिली आहे.

actress sonali and vikas
actress sonali and vikas

काही दिवसांपूर्वी सोनाली पुण्यातील चाकण रोडवरून मित्रासोबत बाईकने जात होती. मागून भरधाव येणाऱ्या एका बाईकस्वाराने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात सोनालीसह तिचा बाईक चालवणारा मित्र देखील खाली पडला. धडक जोरदार बसल्याने सोनाली जागीच बेशुद्ध पडली. अपघात झाल्यानंतर जमावाने सोनालीला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिला काही काळ आयसीयूमध्ये भरती केले होते. उपचारानंतर सोनालीला घरी विश्रांतीसाठी जाण्याची परवानगी दिली. या अपघातात तीच्या मानेलादेखील जोरदार हिसका बसला होता. त्यामुळे अजूनही मानेला त्रास होत असल्याचे ती सांगताना दिसते. तर सोनालीच्या हाताला गंभीर दुखापतही झाली होती. त्यामुळे आधारासाठी तिने आर्म स्लिंग घातली होती. सोनालीचा हाच फोटो विकासने सोशल मीडियावर शेअर केलेला पाहायला मिळाला. त्यावरून सोनालीचा अपघात झाल्याचे तिच्या चाहत्यांना कळले होते. त्यानंतर तिच्या चाहत्यांनी अपघाताबाबत विचारपूस करण्यास सुरुवात केली. त्यामुळे स्वतः सोनालीनेच एक व्हिडिओ शेअर करून या अपघाताची माहिती देण्याचा निर्णय घेतला.

sonali patil actress
sonali patil actress

मराठी बिग बॉसचा ३ रा सिजन अभिनेत्री सोनालीचे युट्युबवर देखील अनेक फॉलोअर्स आहेत. आपल्या कुटुंबासोबत माजमस्ती करतानाचे तसेच वेगवेगळ्या रेसिपीज बनवण्याचे ती व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या या व्हिडिओला चाहत्यांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत असतो. अशातच आता या अपघातातून सोनाली रिकव्हर होत असलेली पाहायला मिळत आहे. पण अजूनही तिच्या मानेमध्ये तिला थोडासा त्रास जाणवत आहे. मराठी बिग बॉसमध्ये उत्कर्ष शिंदे आणि सोनालीची चांगलीच गट्टी जमली होती. काल टी सिरीजमध्ये एका गाण्याची त्याची रेकॉर्डिंग सुरू होती. त्यावेळी सोनालीने युट्युब वर लाईव्ह करत उत्कर्षची भेट घेतली. गप्पा टप्पा आणि फुल माजमस्ती करत तिने उत्कर्षला या व्हिडिओतून बोलतं केलेलं पाहायला मिळालं.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *