मध्यप्रदेशात एक शैक्षणिक घोटाळा झाला होता. ‘व्यापम घोटाळा’ म्हणून हा घोटाळा २०१३ साली उघडकीस आला होता याच घोटाळ्यावर आधारित “The Whistleblower” नावाने वेबसिरीज बनवण्यात आली आहे. या वेबसिरीजमध्ये सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर, रवी किशन हे कलाकार महत्वाची भूमिका साकारत आहेत. या वेबसीरीजच्या प्रमोशनसाठी कलाकार मंडळी कपिल शर्माच्या शोमध्ये दाखल झाले होते. आपल्याकडे चला हवा येऊ द्या हा शो मराठी चित्रपटांच्या प्रमोशनसाठी ओळखला जातो तर हिंदी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माचा शो प्रसिद्धी मिळवताना दिसतो.

वेबसिरीजच्या माध्यमातून सोनाली कुलकर्णी पहिल्यांदाच कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावताना दिसली. तिथे घडलेला एक क्षण सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोनाली कुलकर्णी कपिल शर्माला भेटल्यावर विचारते की, मी एवढ्या सगळ्या हिंदी चित्रपटात काम केलं आहे पण मला तुझ्या शोमध्ये येण्याची कधीच संधी मिळाली नाही’. सोनालीच्या या नाराजीवर कपिल शर्मा तिचे स्वागत करतो आणि ‘ ये हमारा सौभाग्य है की आज आप हमारे शो पे आयी है…’ असे सोनालीला म्हणतो. त्यावर सोनाली कपिलला ‘लेकीने हिंदी- इंग्लिश की ही बातें करोगे मराठीत बोल थोडं…मुंबईत राहतोस इतके सगळे छान छान ऍक्टर्स आहेत आणि आमच्याशी मराठीत बोलत नाहीस? …जिथे आपण राहतो तिथलं थोडं यायला पाहिजे की नाही? ‘ असं म्हणत सोनाली कपिलला झापताना दिसते. मराठीत बोल असं सोनाली म्हणताच कपिल शर्माची मात्र बोबडी वळते आणि पंजाबित बोलून सोनालीची माफी मागतो. हा सर्व मजेचा आणि गमतीचा भाग असला तरी सोनालीने मराठी भाषेचा आग्रह धरला म्हणून तिचं कौतुक होताना दिसत आहे.

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या अगोदर देखील कपिल शर्माला अभिनेत्री शिवानी दांडेकर हिने मराठीत बोल म्हटली होती. शिवणीने हि पोळी साजूक तुपातली.. ह्या टाईमपास चित्रपटातील गाण्यात पाहायला मिळाली होती. २०१७ साली शिवानी दांडेकर आणि सोनाक्षी सिन्हा कपिल शर्मा च्या शोमध्ये दाखल झाल्या होत्या त्यावेळी शिवणीने कपिलला इंग्रजी भाषेतून उत्तर देत होती त्यावेळी कपिल शर्मा तिला हिंदीतून बोल असं म्हटला होता. त्यावर शिवानी म्हणते की मला ह्या शोमध्ये का बोलवलं मला हिंदी येत नाही मला मराठी येत तुला मराठी येतं?…इंग्लिश बोलते मी मराठी बोलते मी आणि तू हिंदी बोलणार आता काय करायचं?…मुंबईमध्ये राहून तुला अजून मराठी येत नाही?…’ शिवणीच्या बोलण्यावर कपिल शर्मा त्यावेळी देखील चाचपडला होता. असो मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेता सचिन खेडेकर यांना नव्या वेबसिरीज करता खूप खूप शुभेच्छा…