मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने गेल्या वर्षी म्हणजेच ७ मे रोजी कुणाल बेनोडेकरशी लग्न गाठ बांधली होती. वाढदिवसाच्याच दिवशी सोनालीने दुबईत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केलं होतं. विशेष म्हणजे तिच्या लग्नाला तिचे आई- बाबा आणि कुणालचे आई- बाबाही नव्हते. ७ मे रोजी दोघांनी मोजक्याच मित्रमंडळींच्या समवेत दुबईतील एका मंदिरात लग्न केलं होतं. सोनाली आणि कुणाल एकाच देशात अडकल्यामुळे आई वडिलांच्या अनुपस्थितीत त्यांना हे लग्न करावं लागलं होतं. परंतु लग्नाला एक वर्ष पूर्ण होत नाहीत तोवरच त्यांनी पुन्हा एकदा लग्न करण्याचा घाट घातला आहे.

येत्या ७ मे २०२२ रोजी सोनाली आणि कुणालच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होत आहे. याचेच औचित्य साधून त्यांनी याच दिवशी लग्न करण्याची तयारी सुरू केली आहे. ७ मे २०२२ रोजी लंडनमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार असल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. या लग्नाचा थाट देखील तेवढाच मोठा असणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. लग्नातली हौस अपूर्ण राहिल्याने तसेच मित्रमंडळींना आणि नातेवाईकांना पहिल्या लग्नाला बोलावता न आल्याने त्यांनी हे लग्न मोठ्या थाटात पार पडणार असल्याचे म्हटले आहे. पुण्यातील पिंपरी भागातील रांका ज्वेलर्स ह्या प्रसिद्ध सोन्याच्या दुकानातून प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वीच तिच्या लग्नाच्या तयारीसाठी खरेदी केली आहे. त्यामुळे हे लग्न मोठ्या थाटा माटात पार पडणार असल्याचं दिसून येतंय. मराठीतील बरेच दिग्गज कलाकार ह्या लग्नाला आवर्जून हजेरी देखील लावताना पाहायला मिळणार आहेत.

गेल्या वर्षी सोनाली आणि कुणाल यांनी रजिस्टर पद्धतीने लग्न केले होते मात्र ७ मे रोजी त्यांचे पारंपरिक पद्धतीने लग्न होणार आहे. या सोहळ्याचा थाट लंडनमध्ये रंगणार आहे. सोनाली सध्या मुंबईतच वास्तव्यास आहे मात्र काही दिवसातच ती आपल्या कुटुंबासोबत लंडनला रवाना होणार आहे. याच दिवशी मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे विवाहबद्ध होणार आहेत. त्यामुळे या दोन्ही कलाकारांची लगीनघाई कशी सजणार याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना आहे. दोघांच्या घरी लग्नाची खरेदी झाली असून आता काही दिवसातच हळद आणि मेहेंदिचा सोहळा रंगलेला पाहायला मिळणार आहे.