सेलिब्रिटींच्या लग्नाचा थाट हा नेहमी चर्चेचा विषय ठरत असतो. बॉलिवूड सृष्टीतील प्रसिद्ध कलाकार आपल्या लग्नाचा सोहळा वृत्त माध्यमांपासून लपवून ठेवतात. आणि एखाद्या खास क्षणी लग्नाचे फोटो प्रसिद्ध करतात. अशाच काहीशा अंदाजात सोनाली कुलकर्णी हिने देखील आपले लग्न एका खास पद्धतीने अरेंज केलेले पाहायला मिळाले. तिच्या लग्नात तिने कोणालाही या क्षणाचे फोटो व्हायरल करण्यास मनाई केली होती. योग्य वेळी मी ते फोटो तुमच्यासमोर आणेल असे तिने म्हटले होते. त्यानुसार काल तिने आपल्या लग्नाच्या सोहळ्याचे काही खास फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहेत.

कुटुंबियांच्या अनुपस्थितीत दुबईला ७ मे २०२१ रोजी सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला होता. तिच्या लग्नाला काही मोजकेच मित्रमंडळी त्यावेळी उपस्थित राहिले होते. दोनवेळेस त्यांनी लग्नाची तारीख ठरवली होती मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे लग्न पुढे ढकलण्यात आल्याने त्यांनी हा निर्णय घेतला होता. परंतु आपल्या लग्नात राहून गेलेल्या ईच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून तिने लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी पुन्हा एकदा लग्नाचा घाट घातला. हळद, मेहेंदी सोहळा, संगीत सोहळा या सर्वांचा तिला अनुभव घ्यायचा होता लग्नातली राहून गेलेली हौस तिला पुन्हा एकदा अनुभवायची होती आणि म्हणूनच तिने कुणाल सोबत लग्न केले. यावेळी सेलिब्रिटी विश्वातील अनेक कलाकारांना तिने आमंत्रित केले होते. मात्र या सोहळ्याचे क्षण व्हायरल करण्यास तिने मनाई केली होती. लंडनला पार पडलेल्या तिच्या लग्नात प्रार्थना बेहरे आणि अभिषेक जावकर या दाम्पत्याने आवर्जून हजेरी लावली होती. आणखीन देखील काही कलाकार ह्या सोहळ्यावेळी उपस्थित असल्याची माहिती मिळते पण कोणीही तिच्या लग्नाचे फोटो सोशिअल मीडियावर व्हायरल केले नाहीत.

सोनालीचे दुसऱ्यांदा लग्न झाले मात्र तिने ते सोशल मीडियावर का प्रसिद्ध केले नाही असे तिला विचारण्यात येऊ लागले तेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी ते प्रसिद्ध करेन असे तिने तिच्या चाहत्यांना आवाहन केले होते. ११ ऑगस्ट रोजी प्लॅनेट मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर सोनालीच्या लग्नाचे खास क्षण तिच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहेत. ७ मे २०२२ ते ११ ऑगस्ट २०२२ या काळात राखून ठेवलेले क्षण असे म्हणत तिने आपल्या सप्तपदी , कुणालच्या हातात हात घेतलेला फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आहे. या फोटोमध्ये सोनसळी हिरव्या रंगाचे पैठणी नेसलेली पहायला मिळत आहे. त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मवर हे क्षण पाहण्यासाठी तिचे चाहते देखील निश्चितच उत्सुक असतील. ११ ऑगस्ट रोजी हे आठवितील क्षण प्रेक्षकांसमोर येणार आहेत त्याची प्रतीक्षा सर्वांनाचा लागून राहिली आहे. असो अभिनेत्री सोनाली आणि कुणाल ह्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…