आपल्या अभिनयाने धुरळा उडवणारी आणि स्क्रिनवर भल्याभल्यांची बोलती बंद करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या चर्चेत आहे ती तमाशा लाइव्ह या सिनेमामुळे. पण या सोनालीला एका गोष्टीचा फोबिया आहे. ही गोष्ट करायची म्हटलं की तिला भीती वाटते. काय आहे तो फोबिया याचा किस्सा तिनेच एका मुलाखतीत सांगितला. सोनालीला पदार्थ बनवायलाही आवडतं आणि खायलाही. अमूकच पाहिजे असा तिचा खाण्याच्याबाबतीत काहीच नखरा नाहीय. पोहे आणि चहाची ती भलतीच चाहती आहे. खाण्यासाठी जगत नाही तर जगण्यासाठी खाते.

म्हणूनच जेव्हा ती हॉटेलमध्ये जाते तेव्हा मेन्यूकार्ड बघून ऑर्डऱ द्यायची म्हटलं की तिच्या जीवावरच येतं. तिला याच गोष्टीचा फोबिया आहे. कार्डमधले पदार्थ वाचून ऑर्डर देण्याची तिला खूपच भीती वाटते, त्यामुळे जेव्हा तिला हॉटेलमध्ये जायचं असतं तेव्हा ती सोबत अशा व्यक्तीला घेऊन जाते जो खवय्या आहे आणि त्याला ऑर्डर देण्याचं टेक्निक माहित आहे. सध्या सोशलमीडियावर फक्त आणि फक्त गाजतय ते रिल्स म्हणजे छंद लागला. या गाण्याने धुरळा उडवला आहेच पण सोनाली कुलकर्णी सध्या चर्चेत आहे ती तमाशा लाइव्ह या सिनेमामुळे. हा सिनेमा बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घालतोय. या सिनेमाच्या निमित्ताने सोनाली गेल्या काही दिवसांपासून अनेक मुलाखती देत आहे. यामध्ये तिच्या फिल्मीकरिअरविषयी तर गप्पा होत आहेतच पण सोनालीचं लग्नं, हनिमून, नवरा, सासर, तिचं खादयप्रेम अशा बऱ्याच गोष्टींवर सोनाली दिलखुलासपणे बोलताना दिसतेय. याच गप्पांच्या ओघात सोनालीला एका गोष्टीचा फोबिया असल्याचं तिनं सांगताच चाहते चिंतेत पडले. एक गोष्ट आहे ज्याची सोनालीला खूप भीती वाटते.

मग काय, सोनाली अशावेळी एखादया खवय्यालाच हाताशी धरते. सोनालीने लग्नानंतर तिच्या लंडनच्या सासरी तांदुळाची खीर बनवली होती. ते फोटो खूप व्हायरल झाले होते. तर कॉलेजमध्ये असताना पहिल्यांदा सोनालीने पनीरची भाजी भरवली होती जी खूप वाईट झाली होती असं सोनाली सांगते. सोनालीचा नवरा कुणाल खूप छान स्वयंपाक बनवत असल्याचंही सोनालीनं सांगितलं. सोनालीही सुगरण आहे. कामाच्या किंवा लग्नानंतर फिरण्याच्या निमित्तानं जगभरातील कित्येक हॉटेलमध्ये जायचं म्हटलं मेन्यूकार्डमधून ऑर्डऱ देण्याच्या विचारानं सोनालीला घाम फुटतो. असो अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिला तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…