बिगबॉसच्या घरात येताना अभिनेत्री स्नेहा वाघाने तिचा दुसरा पती अनुराग बद्दल वाईट अनुभव शेअर केला होता त्यावर अनुरागनेही तिला तू बिगबॉसमधून बाहेर आल्यावर मला एक तरी पुरावा दे अशी पोस्ट सोशिअल मीडियावर केली होती. २०१५ साली तिने इंटेरिअर डिझायनर असलेल्या अनुराग सोळंकी सोबत दुसरा विवाह केला मात्र अनुरागच्या त्रासाला कंटाळून अवघ्या ८ महिन्यातच तिने त्याच्यापासून घटस्फोट घेण्याचे ठरवले. कालच्या भागात स्नेहाने तिचा पहिला पती अविष्कार दारव्हेकर पासून घटस्फोट का घेतला याचा वाईट अनुभव सांगितला. ह्यावेळी बोलताना तिच्या सोबत सुरेखा कुडची आणि जय हे दोघे तिच्यासोबत घडलेली कहाणी ऐकताना पाहायला मिळते.

सुरेखा कुडची यांच्यासोबत बोलताना स्नेहा म्हणाली ” माझं अविष्कारासोबत खूपच कमी वयात लग्न झालं होत. काहीही कारण काढून तो मला मारहाण करायचा. माझ्या चेहऱ्यावर त्यांनी मारहाण केल्याचे वन देखील अनेकांनी पाहिलेत. सगळ्यांना त्यातलं सगळं माहित आहे पण कोणीही काही बोलत नव्हतं. सकाळी मी अर्धमेल्या अवस्थेत तशीच सेटवर जायचे. सेटवरील लोकांनाही सर्वकाही माहित झालेलं. माझी हि झालेली अवस्था तेथिल लोकांना पाहवत नव्हती. सेटवरील लोक त्यावेळी मला खूप समजून घायचे मला वेळ द्यायचे. सेटवर माझं मन रमायचं पण संध्याकाळ झाली कि मला भीती वाटायची. घरी गेल्यावर आता अविष्कार माझ्यासोबत आणखीन काय करेल ह्या भीतीने मला घरी जायची भीती वाटायची. आविष्काराने मला खूपच त्रास दिलाय. मी त्याने दिलेला त्रास कधीही विसरू शकत नाही. त्यावेळी मी अवघ्या १७ वर्षांची होते. मी आविष्काराच्या घरातून पळून माझ्या घरी गेली होते. आता मी त्याचा विचार देखील करू शकत नाही. मी पुन्हा त्याच्याकडे परतेन किंवा आमच्यात पुन्हा काही घडेल अशी तिळमात्रही आशा कोणी बाळगू नये.

काहीदिवसापूर्वीच आविष्काराने स्नेहल मिठी मारलेला तो क्षण चांगलाच व्हायरल झाला होता. कदाचित त्यामुळेच स्नेहाने हा विषय काढला असल्याचं बोललं जातंय. अविष्कार आणि स्नेहा पुन्हा एकत्र येणार कि काय अश्या चर्चाना उधाण आलं होत. त्यामुळेच ह्या चर्चेला थांबवण्यासाठी कदाचित तिने हे विधान पुन्हा काढल असाव. सुरेखा ताई स्नेहा आणि जय एकत्र चर्चा करत असताना सुरेख ताई देखील म्हणाल्या कि तू हे जे काही सांगितलं ते खूपच धक्कादायक आहे. इतक्या कमी वयात तू जे सहन केलं तसं कदाचित कोणी सहन देखील केलं नसत. इथे बिगबॉसच्या घरात आल्यापासून आम्हाला किचनमध्ये काम करावं लागतंय. “किती पण प्रेमाने करून घाला, जिवाचं रान करा त्याला किंमत नाहीये, आमची किंमत तेव्हाच कळेल जेव्हा आम्ही तिथून बाहेर पडू”. असं सांगत अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी देखील खंत व्यक्त केली.