स्नेहा वाघाच्या पोस्टमुळे प्रेक्षक संभ्रमात लोक म्हणाले बिग बॉसचा शो स्क्रिप्टेड आहे आणि म्हणून तो आम्हाला..

बिग बॉसच्या घरात नुकताच हल्लाबोल हा टास्क खेळण्यात आला होता. त्यात जय दुधाने आणि गायत्री दातार यांच्या टीमने बाजी मारलेली पाहायला मिळाली. आता कॅप्टन पदासाठी दावेदार ठरलेले जय आणि गायत्री इतर सदस्यांना आपल्या बाजूने मत देण्यासाठी विनवणी करताना दिसत आहेत. दरम्यान संचालकाने दिलेल्या या टास्कच्या निर्णयावर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या टास्कचे विजेते विकास पाटील आणि विशाल निकम असायला हवे होते , जय आणि गायत्री फेअर गेम खेळत नाहीत असेही प्रेक्षकांचे याबाबत म्हणणे आहे. या निर्णयाबाबत आता महेश मांजरेकर काय उत्तर किंवा कुणाला खडेबोल सूनावतात हे पाहणे रंजक होणार आहे.

इकडे मात्र स्नेहा वाघने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे प्रेक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. एका व्हिडिओत स्नेहा वाघ ‘गॉसीप अँड किचन फाईट’ असे कॅप्शन देऊन बिग बॉसच्या घरातील घडामोडींबद्दल सांगत आहे. मात्र तिने काढलेला हा व्हिडीओ नेमका कुठला आहे?….बिग बॉसच्या घरात राहून व्हिडीओ शूट कसा केलास?…तू बिग बॉसच्या घरात राहून इंस्टाग्रामवर कशी ?…तू बिग बॉसच्याच घरात आहेस ना? असे एक ना अनेक प्रश्न आता तिच्या चाहत्यांना पडले आहेत. बिग बॉसच्या घरात जाण्याअगोदर स्नेहा वाघचे सोशल मीडिया अकाउंट तिची टीम हँडल करत आहे. एवढेच नाही तर बिग बॉसच्या घरातील सर्वच सदस्य सोशल मीडियावर सक्रिय आहेत. त्यामुळे बिग बॉसच्या घरातील प्रत्येक अपडेट त्यांच्या अकाऊंटवर पाहायला मिळत आहे. मात्र असे असले तरी हे सर्व अकाउंट सर्व सदस्यांच्या टीमकडून हँडल केले जात आहेत, मात्र स्नेहा वाघच्या त्या व्हिडीओ मुळे बिग बॉसचा शो स्क्रिप्टेड आहे आणि म्हणून तो आम्हाला फेक वाटतो अशा संतप्त प्रतिक्रिया प्रेक्षकांनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान स्नेहा वाघच्या व्हिडिओत देखील ती ज्या ठिकाणी उभी आहे तिथे कुठेही बिग बॉसच्या घराचा भास होत नाही. त्यामुळे स्नेहाने काढलेला हा व्हिडीओ बरेच काही सांगून जातो असेच चित्र सध्या तरी दिसत आहे. दरम्यान स्नेहा वाघ, जय दुधाने, गायत्री दातार, मीरा जगन्नाथ या सदस्यांवर प्रेक्षक आक्षेप घेत आहेत. त्यामुळे ह्या सदस्यांना बिग बॉसच्या घरातून लवकरात लवकर बाहेर काढा अशी मागणी केली जात आहे.