स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालिकेतील माऊचे पात्र आणि कथानक प्रेक्षकांना खूपच भावलेले पाहायला मिळते याच कारणामुळे या मालिकेने नुकताच २०० भागांचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. परंतु नुकतीच एक दुःखद बाब समोर आली आहे ती म्हणजे मालिकेतील अभिनेत्रीला नुकताच पितृशोक झाल्याने तिने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. कालच मुलगी झाली हो या मालिकेतील अभिनेत्री “श्वेता अंबिक”र हिच्या वडिलांचे निधन झाले असल्याचे तिने इंस्टाग्रामवरून आपल्या चाहत्यांना कळवले आहे.

वडिलांच्या अचानक जाण्याने ” बाबा….तुमच्याशिवाय जगणं खूप अवघड आहे…” असे म्हणत तिने एक भावनिक पोस्ट शेअर करून वडिलांसोबत असलेला आपला फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. श्वेता अंबिकर हिने मुलगी झाली हो या मालिकेत आर्याची भूमिका साकारली आहे. या मालिकेव्यतिरिक माझे मन तुझे झाले, दुर्वा, पुढचं पाऊल, बाजी, तू माझा सांगाती, दिल दोस्ती दुनियादारी या मालिकांमधून काम केले आहे. भेट हा मराठी चित्रपट तिने अभिनित केला असून नाटक, चित्रपट, मालिका असा प्रवास तिचा चालूच आहे. वडिलांच्या निधनाने श्वेता पुरती खचली असल्याने सह कलाकारांनी श्वेताला खंबीर राहण्यास सांगून तिचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. मालिकेतील दिव्या सुभाष म्हणजेच माऊ आणि विलास म्हणजेच किरण माने काही दिवसांपूर्वी महा मा रीच्या सावटात अडकले आहेत. सध्या ते सुखरूप असून लवकरच चित्रीकरणासाठी सज्ज होतील असे सांगण्यात येत आहे. तर गोव्यात होत असलेले मालिकेचे शूटिंग देखील नुकतेच बंद झाले आहे. त्यामुळे मालिका सध्या गुजरातमध्ये शूट करण्यात येईल असे बोलले जात आहे. याबाबत अधिकृत बातमी लवकरच समोर येईल. मसलिकेतील माऊ , आर्या, विलास, सिद्धांत, दमयंती ही सर्वच पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहेत त्यामुळे अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. आता काही दिवसांसाठी तरी मालिकेचे कलाकार घरीच राहून आपल्या आरोग्याची काळजी घेण्यावर भर देताना दिसणार आहेत. त्यात ही दुःखाची बातमी आल्याने या सर्व कलाकारांनी हळहळ व्यक्त केलेली दिसत आहे. श्वेता अंबिकरला या दुःखातून सावरण्यास पाठबळ मिळो हीच एक सदिच्छा…