Breaking News
Home / जरा हटके / अभिनेत्री श्रेया बुगडेचा हा खजिना डोळे दिपवणारा नव्हे तर डोळे सुखावणारा

अभिनेत्री श्रेया बुगडेचा हा खजिना डोळे दिपवणारा नव्हे तर डोळे सुखावणारा

कुणाला कशाचे कलेक्शन करण्याचे वेड असेल हे काही सांगता येत नाही. त्यात कलाकार मंडळी म्हटलं की मग अशा स्टाईलबाज गोष्टी तर त्यांच्या संग्रहात असायलाच पाहिजेत. अभिनेत्री श्रेया बुगडे हिच्याकडे कुठल्या अक्सेसरीजचे कलेक्शन आहे हे जर ऐकलं तर तुम्ही आश्चर्य व्यक्त कराल. श्रेया कुठे फिरायला जाते तिथे शॉपिंग करायला निघाली किती येताना वेगवेगळ्या प्रकारचे गॉगल्स खरेदी करते आणि तिच्या या गॉगल वेडामुळेच श्रेयाकडे वेगवेगळ्या आकारांच्या, वेगळ्या कलरटोनच्या गॉगल्सच्या प्रचंड व्हरायटी तिच्या कलेक्शनमध्ये आहेत. हे सगळे गॉगल ती फक्त तिच्या कपाटाच्या ड्रॉवरमध्येच ठेवत नाही तर त्या त्या गॉगलला शोभणारा ड्रेस लूक करत फोटो काढण्याची हौसही भागवून घेते. श्रेयाच्या सोशल मीडिया पेजवर जर तुम्ही भटकंती केली तर तिच्या या गॉगल खजिन्याचा तुम्हाला नक्कीच प्रत्यय येईल.

marathi actress shreya
marathi actress shreya

चला हवा येऊ द्या या शोमधून कॉमेडीची क्विन अशी ओळख निर्माण केलेली अभिनेत्री श्रेया बुगडेला गॉगल्सचं प्रचंड वेड आहे. कुणाकडे फार तर तीन-चार गॉगल असू शकतात पण सध्या श्रेयाकडे शंभर वेगवेगळ्या प्रकारचे गॉगल्स आहेत जे तिने कधी कामाच्या निमित्ताने किंवा भटकंतीच्या निमित्ताने वेगवेगळ्या शहरातून खरेदी केले आहेत. इतकेच नव्हे तर त्यापैकी काही गॉगल्स ऑनलाईन शॉपिंग करून मागवले आहेत. श्रेयाच्या कलेक्शनमध्ये चौकोनी, गोल या नेहमीच्या आकारासोबत हार्ट शेप , त्रिकोण , लंबगोल अशा वेगवेगळ्या फ्रेमच्या आकाराचे गॉगल आहेत. कलर टोन बाबत तिला जरी ब्राऊन कलर आवडत असला तरी बॉटल ग्रीन , ग्रे , ब्लॅक, मस्टर्ड यल्लो या वेगवेगळ्या ग्लास कलरचे गॉगल्स श्रेयाच्या संग्रहात आहेत.. काही दिवसांपूर्वी श्रेयाने घातलेल्या त्रिकोणी आकाराच्या फ्रेमचा गॉगल तुफान हिट झाला होता. तिच्या या गॉगल कलेक्शन आणि गॉगललूक फोटोचे तिचे चाहते नेहमीच कौतुकही करत असतात आणि खूप छान कमेंट्सही देत असतात.

actress shreya bugde
actress shreya bugde

श्रेया सांगते ,”आता असं झालं आहे की मी कुठेही फिरायला गेले की तिथे माझी सगळ्यात पहिली खरेदी ही गॉगलची असते. माझ्याकडे जे गॉगल आहेत त्यामध्ये काही ग्लासचा रंग वेगळा आहे व कधी कधी त्याची जी फ्रेम आहे तिच्यावर काही वर्क केलेले गॉगल माझ्याकडे आहेत. काही पांढऱ्या, गुलाबी, फ्रेमचे आहेत. जे मी नेहमी घालत नाही पण कधीतरी फंकी लूक जर मला पाहिजे असेल तर मी घालते आणि फोटो काढते. माझ्याकडे असलेल्या गॉगलपैकी सगळेच गॉगल ब्रँडेड किंवा खूप महाग आहेत असे नाही. तर स्ट्रीट शॉपिंगमध्ये खरेदी केलेलेही आहेत. फक्त त्याचा कधी आकार श्रेयाला आवडतो तर कधी रंग श्रेयाला आवडतो. कधी त्याच्यावर केलेलं कलाकुसरीचे काम श्रेयाला आवडतं आणि त्यातूनच गॉगल खरेदी करते.
श्रेयाच्या अभिनयाची सुरुवात खरे तर गंभीर भूमिकांनी झाली पण सध्या मात्र श्रेया विनोदी अभिनयातील बापमाणूस झाली आहे. तर ज्या श्रेयाचे असंख्य चाहते आहेत . ती मात्र वेगवेगळ्या प्रकारचे गॉगल खरेदी करण्याची चाहती आहे.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *