
सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण व्यक्त होताना दिसतात. कोणी रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा करतात तर कोणी आपल्या जवळच्या व्यक्तींबद्दल भरभरून लिहितात. आपले अनुभव, आपली सुख दुःख चाहत्यांसोबत शेअर करण्याचा जवळचा आणि सोपा मार्ग म्हणून कलाकार मंडळी या माध्यमांचा वापर करतात. अभिनेत्री श्रेया बुगडे ही कायम सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करताना दिसते. चला हवा येऊ द्या च्या सेटवरच्या गमतीजमती असो किंवा भाऊ कदम, कुशल बद्रिकेची फिरकी घेणे असो ती असे अनेक व्हिडीओ तिच्या इन्स्टग्रामवर शेअर करताना दिसते. नुकतेच श्रेयाने अभिनेता पियुष रानडे सोबतचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

पियुषचा वाढदिवस श्रेयाने तिच्या खास अंदाजात साजरा केलेला पाहायला मिळतो. पियुषला बर्थडे सरप्राईज म्हणून त्याला एका रेस्टोरंटमध्ये बोलावण्यात आले आणि हे सेलिब्रेशन करण्यात आले. श्रेया बिगडे ही पियुषला आपला भाऊ मानते. मला जर भाऊ असता तर तो तुझ्यासारखा असता अशा आशयाची पोस्ट श्रेयाने तिच्या इन्स्टग्रामवर शेअर केलेली आहे. भावा बहिणीचं हे नातं तितकंच स्पेशल असल्याचे श्रेयाच्या पोस्टमधून दिसून येते. आपल्या पोस्टमध्ये श्रेया पियुषचे कौतुक करताना थांबत नाही, ती म्हणते की, तू नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ आहेस आणि तुझ्याशिवाय माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही. जर प्रत्येक बहिणीला तुझ्यासारखा भाऊ मिळाला तर जग आणखी चांगलं होईल. मोठ्या भावाबरोबर आयुष्य नेहमीच सुखकर जातं. तू माझा खूप चांगला मित्र आहेस. तुझा वाढदिवस साजरा करताना मी इथे आहे याचा मला खूप आनंद आहे दादू. श्रेयाच्या या पोस्टवर सेलिब्रिटींनी देखील पियुषला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत. मराठी कलाकारांचं एकमेकांशी खूप छान बॉंडिंग जुळून आलेलं दिसतं. एकत्र काम करत असताना ही कलाकार मंडळी एकमेकांशी नाती सुद्धा जोडताना पाहायला मिळतात.

अभिज्ञा भावे हिच्यासोबत श्रेयाचे खूप चांगले बॉंडिंग जुळलेले आहे. या दोघींची अतूट मैत्री गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. त्यामुळे वाढदिवस असो किंवा एखादे खास सेलिब्रेशन ही कलाकार मंडळी एकमेकांना भेटल्याशिवाय राहत नाहीत. अभिनेता पियुष रानडे बद्दल बोलायचं झालं तर तो सध्या पिंकीचा विजय असो या मालिकेत काम करत आहे. शाल्मली तोळे हिच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर त्याने मयुरी वाघ सोबत दुसरे लग्न केले होते. मात्र या दोघांनीही घटस्फोट घेतला असल्याचे समोर आले आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख येतंच असं नाही पण म्हणून त्यात गुंतून राहण्यापेक्षा पुढे चालत राहील पाहिजे. आपल्याजवळ नसलेल्या गोष्टीच मनात घर करून ठेवण्यापेक्षा आपल्याकडे काय आहे ह्यात समाधान मानलं तर खूप काही गोष्टीचा उलगडा होऊन सुखकर जीवन जगता येत.