Breaking News
Home / जरा हटके / सासर जोडायला माहेरची नाळ तोडायची काय गरज? शितलीची नवी मालिका

सासर जोडायला माहेरची नाळ तोडायची काय गरज? शितलीची नवी मालिका

झी मराठीवरील ‘लागीर झालं जी’ या लोकप्रिय मालिकेतून शितलीची भूमिका खूपच गाजली होती. ही भूमिका साकारली होती अभिनेत्री “शिवानी बावकर” हिने. या मालिकेनंतर शिवानी ‘अलटी पलटी’ या मालिकेत झळकली मात्र ही मालिका अल्पावधीतच आटोपती घेण्यात आली होती. काही व्हिडीओ सॉंगमधून देखील ती आज्या म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाण सोबत पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आली. शिवानीने अभिनेत्री मधुराणी प्रभुळकर हिच्या ‘मिरॅकल इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅक्टिंग ‘ या संस्थेमधून अभिनयाचे धडे गिरवले आहेत. या अ‍ॅक्टिंग इन्स्टिट्यूट मधून शिवानी बावकर, निखिल चव्हाण यासारखे अनेक कलाकार घडले आहेत. इथूनच तिला ‘उंडगा’ या चित्रपटात पहिल्यांदा अभिनयाची संधी मिळाली होती. उंडगा हा तिचा पदर्पणातील पहिला चित्रपट ठरला.

shivani baokar in kusum serial
shivani baokar in kusum serial

आता शिवानी लवकरच एका मराठी मालिकेतून प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. सोनी मराठी या वाहिनीवर “कुसुम” ही नवी मालिका दाखल होणार आहे. ‘सासर जोडायला माहेरची नाळ तोडायची काय गरज?’… असे म्हणत ही कुसुम आता आपल्या भेटीला येणार आहे. सामान्य घरातली ही कुसुम आपल्या विचाराने माहेरची आणि सासरची नाती घट्ट धरून ठेवताना दिसणार आहे. ‘नुसतं सासर मिरवणं आणि माहेर हरवणं असं कसं चालेल’ असे म्हणून ही कुसुम स्वतः नोकरी करून आपल्या आजारी वडिलांची आणि सासरकडची दोन्ही घरची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. यात तिची होणारी होणारी धावपळ शिवानी आपल्या अभिनयाने चोख साकारेल यात शंका नाही. शिवानी बावकर हिच्यासोबत अभिनेत्री “आरती मोरे” ही देखील तिच्या मैत्रिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र तिचा सहकलाकार कोण असेल हे तुर्तास तरी गुलदस्त्यात आहे. या मालिकेत आणखी कोणकोणते कलाकार दिसणार हे येत्या काही दिवसातच अधिक स्पष्ट होईल. अभिनेत्री शिवानी बावकर हिला कुसुम मालिकेनिमित्त खूप खूप शुभेच्छा…

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *