Breaking News
Home / जरा हटके / वयाच्या १६ व्या वर्षी शिल्पाने या ब्योमकेश बक्शी मध्ये केलं होत काम तर एका मालिकेत चक्क स्वप्नील जोशीची आई साकारली

वयाच्या १६ व्या वर्षी शिल्पाने या ब्योमकेश बक्शी मध्ये केलं होत काम तर एका मालिकेत चक्क स्वप्नील जोशीची आई साकारली

‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत आता बऱ्याच प्रतीक्षेनंतर अनामिक आणि पट्या लग्न बंधनात अडकताना पाहायला मिळणार आहेत अर्थात ह्यात अनेक विघ्न देखील येणार हे निश्चित . झी वाहिनीच्या यादीत हि मालिका ह्या घाटाची सर्वोत्तम मालिका मानली जाते. शिल्पा तुळसकरने अनामिकाचा बिनधास्तपणा आपल्या अभिनयाने सुरेख निभावला आहे. तर स्वप्नील जोशीने साकारलेला साधा भोळा सौरभ पटवर्धन तितकाच भाव खाऊन जाताना दिसत आहे. अनेकांना हे वाचून आश्चर्य वाटेल कि वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी शिल्पा तुळसकर हिने प्रसिद्ध हिंदी मालिका ब्योमकेश बक्शी (जासूस -सत्यन्वेषी) यामध्ये देखील काम केलं होत. ब्योमकेश बक्शी मधील किले का रहस्य ह्या भागामध्ये शिल्पा हिने तुलसी साकारली होती. शिल्पाने साकारलेली तुलसी प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली.

shilpa tulaskar in byomkesh bakshi
shilpa tulaskar in byomkesh bakshi

तू तेव्हा तशी च्या सुरुवातीला स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर एकत्रित झळकणार म्हटल्यावर अनेकांनी नाराजी दर्शवली होती. शिल्पाच्या ऐवजी मुक्ता बर्वे या मालिकेत हवी होती अशी चर्चा जोर धरताना दिसली. कारण स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांनी मालिका तसेच चित्रपटातून काम केले होते त्यामुळे हीच जोडी परफेक्ट जोडी झाली असती असे मत व्यक्त केले जात होते. मात्र कुठेतरी वेगळेपणा हवा म्हणून शिल्पा आणि स्वप्नीलच्या जोडीला काही चोखंदळ प्रेक्षकांनी पाठिंबा दर्शवला होता. शिल्पा तुळसकर आणि स्वप्नील जोशी प्रथमच या मालिकेतून एकत्रितपणे काम करत आहेत असे नाही. तू तेव्हा तशी या मालिके अगोदर ‘हद कर दि’ या हिंदी मालिकेतून हे दोघेही एकत्रित झळकले होते. फक्त या हिंदी मालिकेत ते आई मुलाची भूमिका साकारताना पाहायला मिळाले. रामणारायन रुईया कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतलेल्या शिल्पा तुळसकरने ब्योमकेश बक्षी या हिंदी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. शांती, दिल मिल गये, कैसा ये प्यार है, देवो के देव महादेव अशा अनेक हिंदी मालिकेतून शिल्पा तुळसकर महत्वाच्या भूमिकेत झळकल्या आहेत. हद कर दी या मालिकेत शिल्पाने नम्रता सिंग धनवा ही व्यक्तिरेखा साकारली होती. याच मालिकेत स्वप्नील जोशीने शिल्पाच्या मुलाची भूमिका बजावली होती. निक्कु उर्फ नीरज सिंग धनवा असे स्वप्नीलच्या भूमिकेचे नाव होते. हद कर दि ही एक विनोदी मालिका होती.

shilpa tulaskar ans swapnil joshi
shilpa tulaskar ans swapnil joshi

स्वप्नील जोशी हा देखील त्यावेळी हिंदी मालिका सृष्टीत चांगली लोकप्रियता मिळवताना दिसत होता. या मालिकांनंतर दोघेही मराठी सृष्टीत स्वतःची ओळख निर्माण करताना दिसले. देवकी, डोंबिवली फास्ट, सनई चौघडे, आनंदाचे झाड, भातुकली, शुगर सॉल्ट आणि प्रेम, लहानपण देगा देवा, जावई माझा भला अशा चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून शिल्पा तुळसकरने आपल्या सहजसुंदर अभिनयाची छाप पाडली. तू तेव्हा तशी मालिकेतील अनामिकाची भूमिका तिच्यासाठी खूप वेगळी आहे त्यामुळे ही भूमिका काहीशी आव्हानात्मकच आहे असे म्हणायला हरकत नाही. शिल्पाने आजवर जवळपास १२ चित्रपटांत काम केलं आहे पण मालिकांमध्ये त्या चांगल्याच गाजल्या. मराठी नाटकांत देखील त्यांनी आपली छाप पाडली. आता तुम्ही म्हणाल कि स्वप्नील आणि शिल्पा ह्यांनी मुलगा आई अशी भूमिका साकारली आणि आता चक्क प्रियकर आणि प्रियसेची भूमिका साकारतायेत पण अभिनेता स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर यांच्या वयात खूपच कमी अंतर आहे त्यामुळेच ह्या दोघांची जोडी पाहायला देखील खूप मस्त वाटते.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published.