स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालिकेतील माऊचे पात्र आणि कथानक प्रेक्षकांना खूपच भावलेले पाहायला मिळते याच कारणामुळे या मालिकेने नुकताच २५० भागांचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. मालिकेतील सर्वच पात्र आपल्या अभिनयाने मालिकेत नवा रंग चढवताना पाहायला मिळतात. मुलगी झाली हो मालिकेत आता नीलिमा सावंत ह्या पात्राची एंट्री होत आहे. नीलिमा सावंत साकारणाऱ्या अभिनेत्रीच नाव आहे शर्मिष्ठा राऊत.

मालिकेत अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत साकारत असलेल्या नीलिमा सावंत ह्या पात्रामुळे मालिका आता नव्या वळणावर येऊन ठेपली आहे. शर्मिष्ठा राऊतहि ह्या मालिकेत निगेटिव्ह रोल साकारताना पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिने ह्या पूर्वी देखील अनेक मालिकांत निगेटिव्ह रोल केलेला पाहायला मिळाला आहे. गेल्या वर्षीच ११ ऑक्टोबर २०२० रोजी तिचा “तेजस देसाई” सोबत विवाह झाला. त्यानंतर तिने मुलगी झाली हो ह्या मालिकेतून पुनः पदार्पण केलेले पाहायला मिळणार आहे. “बिग बॉस मराठी सीजन १” मध्ये ती पाहायला मिळाली होती. “जुळून येती रेेशीम गाठी” ह्या मालिकेत तिचा अभिनय खूपच गाजला होता. “जुळून येती रेेशीम गाठी” ह्या मालिकेमुळेच तिला खरी प्रसिद्धी मिळाली होती. “मन उधाण वाऱ्याच” आणि “उंच माझा झोका” ह्या मालिकेत देखील तिने उत्तम अभिनय साकारला होता.तर “नवरा माझा भवरा” आणि “योध्या” अश्या काही मराठी चित्रपटही तिने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. “जो भी होगा देखा जायेगा” हे तिने अभिनित केलेलं नाटकही तुफान गाजलं होत.

माऊने सिद्धांत सोबत लग्नासाठी नकार दिलेला पाहायला मिळाला लग्न करेन तर शौनकशी नाहीतर अविवाहित राहीन असं माऊने सांगितले असले तरी सिद्धांत आपल्या मतावर ठाम असून कोणत्याही परिस्थितीत तो माऊला आपल्या जाळ्यात ओढणार असच दिसतंय. मालिकेत अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत साकारत असलेल्या नीलिमा सावंत ह्या पात्राचा वापर करून तो माऊचे वडिल म्हणजेच विलास पाटलांना बदनाम करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळणार आहे. सिद्धांत आणि नीलिमाच हे कटकारस्थान यशस्वी होणार का? आणि माऊला आणि तिच्या परिवाराला पुढे काय काय अडचणींचा सामना करावा लागणार हे येत्या काही भागात पाहायला मिळेलच. असो अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिला मुलगी झाली हो मालिकेतील पदार्पणासाठी खूप खूप शुभेच्छा..