२६ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचव निधन झाले होते. त्यानंतर मोठमोठ्या कलाकारांनी, त्यांच्या चाहत्यांनी शोकाकुल वातावरणात त्यांना श्रद्धांजली वाहिली. विक्रम काकांसोबत जाम केलेल्या प्रत्येक कलाकाराने त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. या सर्वात मात्र अभिनेत्री सखी गोखले हिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलेलं पाहायला मिळालं. सखी गोखले ने सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली न वाहिल्याने तिच्यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. खरं तर सखी गोखले ही शुभांगी आणि मोहन गोखले यांनी मुलगी आहे. विकिपीडिया किंवा सोशल मीडियावर बहुतेक ठिकाणी मोहन गोखले आणि विक्रम गोखले हे भाऊ दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे ही माहिती चुकीची असल्याचे सखीने आपल्या इन्स्टग्राम स्टोरीवर नमूद केले आहे.

विक्रम काकांच्या निधनानंतर त्यांच्याबद्दल काहीच पोस्ट लिहिली नाही म्हणून तीला असंख्य मेसेजेस येऊ लागले , तिला अनेकांनी ट्रोलही केले. त्यासर्वांना सखीने आपल्या पोस्टमधून एक मेसेज देऊ केला आहे. ती म्हणते की, “मला इथे एकदा काय ते स्पष्ट सांगायचे आहे. विक्रम गोखले हे उत्कृष्ट अभिनेते होते. मी लहान असल्यापासूनच त्यांच्या अभिनयाची जादू पडद्यावर पाहिली आहे. त्यांच्या जाण्याने कलासृष्टीचं प्रचंड नुकसान झालं आहे जे कधीही भरून निघणार नाही. विक्रम काका आणि माझे वडील दोघेही भाऊ नव्हते. आमच्याशी त्यांचं काहीही नातं नाही . फक्त आमच्या कुटुंबियांचे त्यांच्याशी मैत्रीचे संबंध आहेत. आंधळेपणाने सोशल मीडियावरील कुठल्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नका. विकिपीडियावरील माहितीनुसार तुम्ही तुमच्या ज्ञानात भर घालत असाल तर ती सर्वस्वी तुमची चूक आहे. आणि सर्वात महत्वाचं त्यांचं माझ्याशी काही नातं आहे किंवा नाही , मी त्यांच्याबाबत काही लिहावं की नाही हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. मला सोशल मीडियावर अनेकांकडून मेसेजेस, कमेंट्स येऊ लागल्या की तू अजूनही विक्रम काकांबद्दल काहीच का लिहिलं नाहीस म्हणून, अनेकांनी माझ्यावर संताप देखील व्यक्त केला.

पण माझ्यावर राग व्यक्त करण्याआधी यामागचं खरं कारण काय आहे याचा तुम्ही शोध घ्यायला हवा. माझ्यावर राग्य व्यक्त करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा तो वेळ तुम्ही ज्ञान मिळवण्यात घालवावा जेणेकरून तुमच्या कुटुंबियांना तुमच्या मित्रांना तुमची लाज वाटणार नाही. दिवस चांगला घालवण्याचा प्रयत्न करा’. असे म्हणत सखीने ट्रोल करणाऱ्यांना तिच्या शब्दात खडेबोल सुनावले आहेत. विकिपीडियावरील माहितीनुसार अनेक पोस्ट धारकांनी तसेच बतमीदारांनी आपल्या बातम्यांमध्ये मोहन गोखले आणि विक्रम गोखले भाऊ असल्याचे म्हटले आहे त्यामुळे बहुतेकांना हे दोघे भाऊ आहेत अशी माहिती मिळाली. मात्र ही माहिती अत्यंत चुकीची आहे असे सखीचे म्हणणे आहे. आमच्यात असं काहीच नातं नाही हे तिने स्पष्ट केलं आहे. अभिनेते विक्रम गोखले हे उत्कृष्ट अभिनेते होते मला त्यांचा लहानपणापासून आदर आहे पण माझ्या बाबतीत हे जे काही चाललंय ते अत्यंत चुकीचं आहे असं अभिनेत्री सखी गोखले हिने स्पष्ट केलं आहे.