रंग माझा वेगळा या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे साइशा भोईर ही बालकलाकार प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली होती. कार्तिकीच्या भूमिकेने तिला अमाप प्रसिद्धी मिळाली. मालिकेत कार्तिकीची भूमिका खूपच महत्वाची मानली जायची दीपा आणि कार्तिक एकत्र येण्यासाठी ई सतत प्रयत्नात असायची त्यामुळे कार्तिकी इतर कलाकारांपेक्षा स्क्रीनवर जास्त दिसायची. मालिका एका महत्वाच्या टप्प्यावर असतानाच साइशाने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. अर्थात साइशाची शाळा देखील सुरू झाली होती त्यामुळे तिला शाळेचा अनुभव घ्यायचा होता. या कारणास्तव तिने या मालिकेतून एक्झिट घेण्याचा निर्णय घेतला. साइशाला मालिकेच्या शूटिंगला जायला दररोज दोन तास लागायचे. सकाळी लवकर उठून सेटवर गेल्यावर दिवसभर शूटिंग चालायचे.

रात्री १० वाजता पॅकअप झाल्यावर पुन्हा घरी जायला दोन तास लागायचे त्यामुळे साइशा खूपच थकून जायची. अशातच तिची शाळा देखील सुरू झाली आणि दुसरी इयत्तेत असलेली साइशा आपल्या शाळेला मित्रांना भेटायला खूपच उत्सुक होती. यामुळे तिने मालिकेतून काढता पाय घेतला होता असे तिच्या पालकांनी सांगितले होते. मात्र या मालिकेतून बाहेर पडताच साइशा एका नव्या मालिकेत झळकताना दिसणार आहे. झी मराठी वाहिनीवर ८ ऑगस्ट पासून रात्री ९.०० वाजता ‘नवा गडी नवं राज्य’ ही नवी मालिका प्रसारित होत आहे. या मालिकेत साईशाला अभिनयाची संधी मिळाली आहे. साइशाकडे हा नवीन प्रोजेक्ट आल्याने तिने रंग माझा वेगळा या मालिकेतून काढता पाय घेतला असे बोलले जात आहे. यावरुनच साईशाचे पालक देखील आता सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहेत. यावर साइशाच्या पालकांनी ट्रोलर्सना उत्तर दिले आहे . यावर उत्तर देताना तिचे आईवडील म्हणतात की, ‘ज्या मालिकेमुळे साइशाला लोकप्रियता मिळाली होती ती मालिका सोडणे त्यांच्यासाठी खूपच कठीण होते.

मात्र या नवीन मालिकेचे शूट लोकेशन घरापासून खूप जवळ आहे. आणि शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे केवळ तीनच दिवस तिला शूट करावे लागणार आहे. अगोदरच्या सिरिअलमुळे साइशाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. त्यामुळे सर्व गोष्टी गृहीत धरूनच आम्ही हा विचारपूर्वक निर्णय घेतला आहे असे साइशाच्या पालकांनी उत्तर दिले आहे. शूटिंग फक्त तीन दिवसांसाठीच असल्याने साइशा शाळेत सुद्धा जाऊ शकते हा विचार करूनच त्यांनी ही नवी मालिका स्वीकारली आहे. साइशाच्या पालकांनी दिलेले हे उत्तर अनेकांना पटले असून त्यांच्या या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले आहे. रंग माझा वेगळा या मालिकेतील कलाकारांनी देखील साइशाला नवीन मालिकेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नवा गडी नवं राज्य या झी मराठीवरील मालिकेत कश्यप परुळेकर , पल्लवी पाटील, अनिता दाते, वर्षा दांदळे, साइशा भोईर ही कलाकार मंडळी झळकणार आहेत. या नवीन मालिकेसाठी साइशाला मनःपूर्वक शुभेच्छा!.