Breaking News
Home / जरा हटके / सई ताम्हणकरला मिळाला ड्रिमबॉय ? सोशिअल मीडियावर केला खुलासा

सई ताम्हणकरला मिळाला ड्रिमबॉय ? सोशिअल मीडियावर केला खुलासा

मराठी सिनेइंडस्ट्रीत जसा सोज्वळ नायिका साकारणार्‍या अभिनेत्री आहेत तशा बोल्ड नायिकाही आहेत. अशाच बोल्ड नायिकांच्या यादीत अगदी टॉपवर असलेल्या अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्या हॉट फोटोला लाखांवर हिटस मिळत असतात. सईच्या नव्या फोटोशूटकडे तर चाहते डोळे लावून बसलेले असतात. नुकताच सईने एक फोटो शेअर केला आणि हा फोटो बघून तिच्यावर फिदा असलेल्या चाहत्यांना मात्र चांगलाच धक्का बसला आहे. सईला तिच्या स्वप्नातील राजकुमार सापडला असून या खास व्यक्तीसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे सईने या पोस्टमध्ये जाहीर केले आहे.

actress sai tamhankar
actress sai tamhankar

निर्माता अनीश जोगसोबत फोटो क्लिक करत, हो, माझ्या गालावर ब्लश आणणारा तूच आहेस. मला दौलतराव सापडला असं म्हणत सई प्रेमात पडल्याचे दिसत आहे. अभिनयातील वेगवेगळे प्रयोग करणार्‍या सईच्या रूपाने मराठी सिनेमाला एक बोल्ड चेहरा मिळाला. मराठी सिनेइंडस्ट्रीसोबतच सईने काही हिंदी सिनेमांमध्येही लक्ष वेधून घेतले आहे. वेबसिरीज या प्रांतातही सईने स्थान कमावलं आहे. सई म्हणजे फॅशन स्टेटमेंट अशीही तिची ओळख आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पाँडीचेरी या सिनेमातील तिच्या भूमिकेचे कौतुक झाले. अभिनय, बोल्ड फोटोशूट यामुळे सई सतत चर्चेत येत असतेच. खरं तर सईने 2013 ला जाहिरात क्षेत्रात असलेल्या अमेय गोसावी याच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. पण त्यांची मतं न जुळल्याने सई आणि अमेय वेगळे झाले. गेल्या आठ वर्षापासून सई सिंगल होती. अनेकदा तिचे चाहते ती लग्न कधी करणार असे तिला विचारायचे तेव्हा ती स्वप्नातील राजकुमार भेटला की ठरवेन असं म्हणायची. आता अनिशच्या रूपाने सईला मिस्ट्री मॅन सापडल्याने ती आनंदात आहे.

sai tamhankar and anish
sai tamhankar and anish

सई सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये खास पाहुणी म्हणून दिलखुलास हसताना दिसते. सईच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सईला ‘इंटरनेट मूव्ही डाटाबेस’च्या (आयएमडीबी) ‘बेस्ट ऑफ २०२१’ यादीत मानाचं स्थान मिळालं आहे. आयएमडीबीनं नुकतीच भारतीय चित्रपट आणि सीरीजमधल्या दहा सर्वोत्तम कलाकारांची यादी जाहीर केली. या यादीत सईला स्थान मिळालं आहे. सईनं यंदा ‘समांतर’, ‘नवरसा’ आणि ‘मिमी अशा तीन वेगवेगळ्या भाषांमधल्या कलाकृतींमधून वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या. याचीही दखल घेत सईला ‘ब्रेकआउट स्टार’ म्हणून या यादीत स्थान मिळालं आहे. बोल्ड अभिनेत्री असे लेबल असूनही सईने केलेल्या गंभीर भूमिका तितक्याच गाजल्या आहेत.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *