Breaking News
Home / जरा हटके / सई ताम्हाणकर आणि शमिता शेट्टी ह्या दोघींचा राज कुंद्राच्या फिल्मसाठी विचार करण्यात आला होता.. अभिनेत्री गहनाने केला खुलासा

सई ताम्हाणकर आणि शमिता शेट्टी ह्या दोघींचा राज कुंद्राच्या फिल्मसाठी विचार करण्यात आला होता.. अभिनेत्री गहनाने केला खुलासा

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा सध्या जेलमध्ये असला तरी त्याच्या अश्लील व्यवसायाचे मीडिया नवनवीन प्रकरण उघडकीस आणताना दिसत आहे. पण ह्या प्रकरणाशी काडीचाही संबंध नसलेला फक्त नावात साम्य असल्यामुळे मराठी अभिनेता “उमेश कामत” ह्याला फुकटचा त्रास सहन करावा लागला होता. हे प्रकरण शांत होत न होत तेच आता एका मराठी अभिनेत्रीच नाव समोर येत आहे त्या मराठी अभिनेत्रीच नाव आहे “सई ताम्हणकर”. सई ताम्हणकर हिचा ह्या प्रकरणाशी काय संबंध आहे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल ..

raj kundra and gahana vashitha
raj kundra and gahana vashitha

अभिनेत्री गहना विशिष्ठ हिने आज एक मुलाखत दिलीय त्या मुलाखतीत तिने अनेक गोष्टीचा उलगडा केला आहे. राज कुंद्रा ह्यांना ह्या प्रकरणात कस अडकवलं जातंय ते तिने सांगण्याचा देखील प्रयत्न केला. राज कुंद्रा जेलमध्ये जाण्याआधी राज आणि गहना ह्यांची भेट झाली होती. बॅलिफेम नावाच्या अँप मधून राज कुंद्रा काही म्युजिक शो, रिऍलिटी शो , चित्रपट तसेच चॅट शो अश्या प्रकारचं अँप बनवू पाहत होता. ह्यामध्ये वेगळं असं काही नव्हतं ज्यामुळे त्याला जेल व्हावी. गहना त्या फिल्म च डायरेक्शन करणार होती आणि काही चित्रपटांसाठी त्यांनी अभिनेत्री सई ताम्हाणकर आणि अभिनेत्री शमिता शेट्टी ह्या दोघींचा विचार केला होता. ह्या चित्रपटांमध्ये अश्लील असं काहीही नाही फक्त काही रोमँटिक शूट होणार असल्याची चर्चा झाली होती. ह्या पूर्वी अनेक चित्रपटांत असे रोमँटिक सीन घेण्यात आलेत विशिष्ठ वयातील लोकांसाठी हे फिल्म्स केल्या जातात पण त्यासाठी कोणालाही जेलमध्ये जावं लागलं नाही. हे सगळं प्रकरण जाणून बुजून घडवण्यात येतंय असं तिने नमूद केलय. कीर्ती सेननची प्रमुख भूमिका असलेल्या “रिहाई दे” चित्रपटात सई ताम्हणकर महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. मराठी चित्रपटांसोबत तिने अनेक बॉलीवूड फिल्म्स देखील केल्या आहेत. या प्रकरणाबाबत अजून सई ताम्हणकरने स्वतः कुठला खुलासा केलेला नाही, मात्र गहना वशिष्ठने दिलेल्या मुलाखतीमुळे सईची चर्चा सोशिअल मीडियावर रंगताना दिसत आहे.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *