
अभिनेत्री “रुचिता जाधव” गेल्या महिन्यात म्हणजेच ३ मे रोजी पाचगणी येथील एका खाजगी फार्महाऊसमध्ये आनंद माने सोबत विवाहबद्ध झाली होती. आपल्या लग्नाची काही खास आठवण असावी या हेतूने टिनर संगीत सोहळा रद्द करून पाचगणी जवळील आसपासच्या गावातील लोकांना धान्याचे वाटप केले होते त्यामुळे रुचिताचे लग्न आसपासच्या परिसरात चांगलेच चर्चेत आले होते. मिडियामध्येही तिच्या या कार्याचे कौतुक झाले होते. रुचिताचा विवाह ज्यांच्यासोबत झाला ते आनंद माने युवा सेनेत सक्रिय आहेत.

या शिवाय माने डेव्हलपर्सचे ते डायरेक्टर असून Fine Heal या फाउंडेशनची स्थापना त्यांनी केली आहे. राजकारण, समाजकारण यात सक्रिय असलेल्या आनंद माने यांनी राजेंद्र माने फाउंडेशन अंतर्गत सातारा जिल्ह्यातील रुग्णांसाठी ऑक्सिजन व्हॅन ची सेवा पुरवली आहे. या सामाजिक कार्यात त्यांचे वडील राजेंद्र माने यांचेही मोठे पाठबळ त्यांना नेहमीच मिळताना दिसते. को” रो”ना काळात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप असो वा ब्लड डोनेशन या सर्वच सुविधा पुरवण्याचे काम माने फाउंडेशन अंतर्गत करण्यात आले आहे. रुचिता जाधव देखील राजकारणात सक्रिय झाली असल्याच्या चर्चा मागील काही दिवसात पाहायला मिळाल्या होत्या. त्यामुळे आणखी एक मराठी अभिनेत्री राजकारणात आल्यास वावगे ठरायला नको. रुचिताने लव्ह लग्न लोचा, भुताचा हनिमून, आता माझी हटली यासारख्या चित्रपटातून प्रमुख भूमिकेत झळकली आहे. भरत जाधव सोबत बऱ्याच चित्रपटातून तिने त्यांची नायिका साकारली आहे. आता लग्नानंतर ती अभिनय क्षेत्रात पुनरागमन करणार की नवऱ्यासोबत सामाजिक कार्यात उतरणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल तुर्तास या सामाजिक बंधीलकीमुळे रुचिता सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.