आकांक्षा दुबे नंतर आणखी एका अभिनेत्रीची गळफास लावून आत्महत्या…बॉयफ्रेंड सोबत वाद झाल्याची शक्यता

दोन दिवसांपूर्वी भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिच्या मृत्यूच्या बातमीने हळहळ व्यक्त केली जात होती. आकांक्षा दुबे हिचे अफेअर असल्याचे सांगितले गेले यातूनच दोघांमध्ये वाद झाला आणि टोकाचे पाऊल उचलत एका हॉटेलमध्ये तिने गळफास घेतल्याचे सांगितले जात आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत असून आकांक्षाच्या आईकडून रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आकांक्षा दुबेच्या आत्महत्येची बातमी अजूनही निवळली नाही तोच आता उडीया अभिनेत्री आणि गायिका रुचिस्मिता गुरू हिच्या निधनाच्या बातमीने कलासृष्टीत खळबळ माजली आहे. २६ मार्च रोजी रुचिस्मिता हिने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे.

२६ मार्च २०२३ रोजी रुचिस्मिता गुरू हिने तिच्या नातेवाईकांच्या घरी पंख्याला लटकवून गळफास घेतला आहे. ती मूळची सोनेपुर जिल्ह्याची आहे बालनगीर येथील तालपली या परिसरात ती आपल्या कुटुंबासोबत राहत होती. गाण्या सोबतच रुचिस्मिताला अभिनयाची विशेष आवड होती. वेगवेगळ्या मंचावर तिने गायनाचे कार्यक्रम सादर केले होते. काही दिवसांपूर्वीच रुचिस्मिता तिच्या काकांच्या घरी राहायला गेली होती. सुडापाडा या ठिकाणी तिचे काका वास्तव्यास आहेत. रुचिस्मिता हिचे पराठा वरून भांडण झाले होते त्यामुळे ती तिच्या काकांच्या घरी गेली होती. इथेच तिने सर्वांच्या नजरेआड जाऊन गळफास घेतल्याचे समोर आले. रुचिस्मिता हिचा मृतदेह संशयास्पद रीतीने आढळल्याने तिने आत्महत्या केली की तिचा खून करण्यात आला याबाबत अजूनही पोलीस तपास करत आहेत. दरम्यान रुचिस्मिता हिच्या आईने घरी पराठा बनवण्यावरून वाद झाला असल्याचे म्हटले होते. पण त्याअगोदर देखील एकदा तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता असे तिच्या आईचे म्हणणे आहे. याबाबत पोलिसांना रुचिस्मिताचे प्रेमप्रकरण असावे आणि त्यावरूनच तिने हा टोकाचा निर्णय घेतला अशी शंका पोलिसांना आहे.

दरम्यान रुचिस्मिता कोणासोबत नात्यात होती का ती कोणाच्या प्रेमात होती का याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन रुचिस्मिता हिचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. तिचा मृतदेह संशयास्पद रीतीने आढळल्याने तो पोस्टमोर्टम साठी पाठवण्यात आला आहे. पोस्टमोर्टमचे रिपोर्ट अजून न मिळाल्याने पोलीस आणि कुटुंबीय त्याची वाट पाहत आहेत. त्याचसोबत इतर नातेवाईकांकडेही चौकशी सुरू करण्यात आली असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. एकामागून एक अभिनेत्री असं टोकाचं पाऊल का उचलत आहेत ह्याची चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहे. सज्ञान सुशिक्षित आणि प्रसिद्धी मिळवल्यावर देखील अश्याप्रकारे आपलं आयुष्य संपवणं हे खरंच न सुटणार कोड आहे. अभिनेत्रींनी लढा द्यायला शिकलं पाहिजे अडी अडचणीच्या काळात अश्या प्रकारचं पाऊल उचलताना त्यांनी एकदातरी विचार करायला हवा.