बरीचशी कलाकार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या खाजगी आयुष्याबाबत खुलेपणाने बोलताना दिसतात. मग नवीन घर, गाडी खरेदी करणे असो किंवा बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड सोबत प्रेमाची जाहीर कबुली देणे असो. या सर्वच गोष्टी ही कलाकार मंडळी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वीच सई ताम्हणकर हिने देखील निर्माते अनिश जोगच्या प्रेमात असल्याची कबुली दिली होती. आता माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील माया म्हणजेच रुचिरा जाधव हिने देखील बॉयफ्रेंड सोबतचा एक खास फोटो शेअर करून त्याच्या प्रेमात असल्याची कबुली दिली आहे.

रुचिराच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डॉ रोहित शिंदे याने तिच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. त्यात त्याने रुचिराच्या प्रेमात असल्याचे जाहीरपणे म्हटले आहे. रुचिरा आणि रोहित गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. रुचिराच्या बहिणीच्या लग्नात देखील त्याने हजेरी लावली होती. मात्र रुचिराने ही बाब गुलदस्त्यात ठेवणे पसंत केले होते. काल रुचिराच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दोघांनी सोशल मीडियावर जाहीरपणे प्रेम व्यक्त केलं आहे. रुचिरा ज्याच्या प्रेमात आहे तो रोहित शिंदे नक्की आहे तरी कोण ? असा प्रश्न बहुतेकांना पडला आहे. रोहित शिंदे हा पेशाने डॉक्टर आहे. परंतु मॉडेलिंगची देखील त्याला विशेष आवड आहे. मिस्टर इंडिया मॅन ऑफ द ग्लोब इंटरनॅशनल साठी त्याने मॉडेलिंग केलं आहे. काही ब्रॅण्डसाठी त्याने रॅम्पवॉक केलं आहे. कलर्स मराठीवरील तुझ्यावाचून करमेना या मालिकेतून रुचिराने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. बे दुणे दहा, माझे पती सौभाग्यवती, प्रेम हे, फो मो, माझ्या मित्राची गर्लफ्रेंड अशा मालिका वेबसिरीज मधून ती झळकली आहे. झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको या लोकप्रिय मालिकेतून रुचिराने मायाची भूमिका साकारली होती. मायाच्या भूमिकेने रुचिराला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. काही गाण्यात देखील ती झळकली आहे.

रुचिराची बहीण ऋतुजा जाधव हिने देखील मॉडेलिंग केलं आहे. गेल्या वर्षी ऋतुजाच्या लग्नात रोहितने हजेरी लावली होती. रोहितने त्याच्या इन्स्टग्राम अकाउंट वरून रुचिरा सोबतचे फोटो शेअर केले होते. रुचिराच्या प्रेमात असल्याचे त्याने खूप अगोदरच जाहीर केले होते मात्र रुचिराने हे जाहीर करायला थोडा वेळ घेतलेला पाहायला मिळतो आहे. तिच्या या जाहीर कबुलीवर मात्र आता तिच्या चाहत्यांची मनं दुखावली आहेत. असे असले तरी हे दोघे आता लग्न कधी करणार याकडे चाहत्यांचे लक्ष्य लागून राहिले आहे. रुचिराची बहीण ऋतुजा जाधव हिच्या लग्नावेळी अनेक प्रसार माध्यमांनी तिचेच लग्न झाल्याचे सांगितले होते पण नंतर तिने बहीनेच लग्न झाले असल्याचं सांगितले होते त्यावेळी त्या बातमीने मोठा गोंधळ देखील उडाला होता. अभिनेत्री रुचिरा जाधव हिची सध्या कोणतीही मालिका सुरु नसली तरी तिचा चाहता वर्ग नव्या मालिकेची वाट पाहताना पाहायला मिळत आहेत.