
अभिनेत्री रेणुका शहाणे यांची कारकीर्दला एका मराठी चित्रपटापासून सुरवात झाली. “हाच सूनबाई चा भाऊ” हा त्यांनी केलेला पहिला मराठी चित्रपट आजही तितकाच फेमस आहे. “हम आपके है कौन” या हिंदी चित्रपटाने त्याना खूप प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटाच्या पाठोपाठ दूरदर्शनवरील सुरभि या मालिकेतील सूत्रसंचालक म्हणून केलेले काम आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. “दिल ने जिसे अपना कहा , तुन्नू की टीना, एक अलग मौसम, मासूम ह्या हिंदी चित्रपटांसोबत हाय वे, रीटा, दुसरी गोष्ट, ते आठ दिवस, बकेट लिस्ट, गुलाबजाम हे त्यांनी साकारलेले मराठी चित्रपटही प्रसिद्धीच्या झोतात आले.

अभिनय आणि सूत्रसंचालन याचबरोबर त्यांना लिखाणाची देखील खूप आवड आहे. “रीटा” चित्रपटाची पटकथा रेणुका शहाणे यांनीच लिहिलेली आहे. सोशिअल मीडियावर त्या नेहमीच सक्रिय असतात आणि विविध विषयांवर आपली मते मांडत असतात. ह्याच हि एक कारण आहे असं म्हणायला हरकत नाही कारण त्यांचे वडील लेफ्टनंट कमांडर विजयकुमार शहाणे भारतीय नौदलात अधिकारी होते. त्यांची आई शांता गोखले लेखिका आणि चित्रपट समीक्षक आहेत. आई शांता गोखले यांच्याकडून त्यांना खूप प्रोत्साहन मिळाले. शांता गोखले यांनी काही कॉलेज मध्ये शिक्षिकेचं काम देखील केलं आहे. त्यांना दोन डोकमेंटरी फिल्म साठी नॅशनल अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. अनुवादक म्हणून त्यांनी ज्येष्ठ अभिनेत्री दुर्गा खोटे यांच्या प्रख्यात आत्मचरित्रावर काम केले आहे आणि महेश एलकुंचवार, विजय तेंडुलकर, जी.पी. सारख्या अग्रगण्य मराठी नाटककारांच्या अनेक नाटकांचे भाषांतर प्रकाशित केले आहे. सुरुवातीला गोखले यांनी इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून विविध प्रकाशनांमध्ये कथा प्रकाशित केल्या त्यानंतर त्यांनी कादंबर्या प्रकाशित करण्यास सुरवात केली. तिने पहिले पुस्तक रीटा वेलिंकर मराठीत प्रकाशित केले.

शांता गोखले यांना दोन अपत्य एक अभिनेत्री रेणुका शहाणे आणि दुसरे म्हणजे गिरीश शहाणे. रेणुका शहाणे यांचे भाऊ गिरीश शहाणे लेखक, कला समीक्षक आणि सदर लेखक आहेत. रेणुका शहाणे यांचा विवाह हिंदी चित्रपट अभिनेते आशुतोष राणा यांच्याशी झाला. रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा याना शौर्यमान आणि सतेन्द्र हे दोन मुले आहेत. रेणुका शहाणे यांनी २५ हुन अधिक दूरचित्रवाणी मालिका केल्या इतकंच नाही तर “व्हॉट द फोक्स” ह्या वेब्सिरीज मधेही त्या झळकल्या. “सुरभि, सर्कस, खिचडी” ह्या प्रमुख टीव्ही कार्यक्रम त्यांनी केलेली कामे आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. आपल्या कौशल्याने आणि कामातील सातत्याने त्यांनी आजवर मोठी मजल मारली. अभिनेत्री रेणुका शहाणे आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला पुढील वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण टीमकडून खूप खूप शुभेच्छा…