रविना हृतिक यांसारख्या कलाकारांनी आर्यनची बाजू मांडल्यावर कंगनाने असे सुनावले खडेबोल म्हणाली

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक प्रकरणी अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्याला सपोर्ट केलेला पाहायला मिळतो आहे. अभिनेत्री रविना टंडन हिने तर आर्यन खान विरोधात राजकीय डाव आखल्याचे म्हटले आहे. एका मुलाला किती त्रास द्याल असेही तिने पोस्टद्वारे सांगितले आहे. रविना टंडन असो वा सलमान खान शाहरुखच्या बाजूने आलेले पाहायला मिळाले यात नुकतेच अभिनेता हृतिक रोशन याने आर्यनला उद्देशून एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती.

आपल्या पोस्टमध्ये हृतिक आर्यनला सपोर्ट करताना दिसला आणि त्यात तो म्हणाला की, आपल्या आयुष्यात अनेक खडतर प्रवास आहेत त्यात देव आपल्या पाठीशी नेहमीच उभा राहतो…तो अशा प्रवासासाठी एका खास व्यक्तीलाच निवडतो…या संकटाला तू निश्चित मात देशील याची मला खात्री आहे…अशा स्वरूपाची आर्यन खानला संबोधित करून एक भली मोठी सपोर्ट करणारी पोस्ट हृतिक रोशनने लिहिताच कंगना राणावतने पलटवार करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. कंगनाने आपल्या पोस्टमध्ये आर्यन खानला काहीच बोलले नसले तरी त्याच्या बाजूने जे कलाकार पुढे आले आहेत त्यांना तिने धारेवर धरले आहे. कंगना आपल्या पोस्टमध्ये म्हणते की, आता सगळे माफिया पप्पू आर्यनला वाचवायला पुढे सरसावले आहेत…आपण ज्या चूका करतो त्याचा गौरव नाही केला पाहिजे. मला वाटत यातून त्याला सगळं काही समजून जाईल आणि यावरून आपण काय चूक केली हे त्याच्या लक्षात येईल…यातून तो निश्चितच काहीतरी शिकेल आणि पुढे जाऊन चांगले काम करेल…आताच्या घडीला केवळ चर्चा करत बसण्यापेक्षा त्याला सांगून दिलं पाहिजे की त्याने केलेली ही चूक नसून तो एक गुन्हा आहे..

कंगना राणावतच्या या खडेबोल सुराला अनेकांनी योग्य असल्याचे सांगितले आहे. आर्यन खानकडून जी चूक झाली ती पाठीशी न घालता त्याने ती चूक सुधारावी असेच सूचित केले आहे. आर्यनला अटक झाल्यावर मराठी सृष्टीतील अनेक कलाकारांनी बॉलिवूड सृष्टीला धारेवर धरले आहे. कलाकारांच्या मुलांवर चांगले संस्कार होणे गरजेचे आहे तुम्ही अगोदरपासूनच त्यांच्या प्रत्येक चुकीला पाठीशी घालत राहिलात तर असे अनेक आर्यन तुम्हाला सापडतील असे आहेआणि म्हटलं आहे. बऱ्याच दिवसानंतर कंगनाने सोशिअल मीडियावर आपलं मत मांडलेलं पाहायला मिळालं. अन्यायाविरुद्ध आणि चुकीच्या व्यक्तींबद्दल ती नेहमीच आपलं मत मांडताना पाहायला मिळते. क्रांती रेडकर हिचा पती आता आर्यांची केस हाताळत आहे. आजच त्याने प्रेस कॉन्फेरंस मध्ये सर्वकाही योग्य मार्गाने चाललं असून आम्ही कोणाच्याही बंधनात न अडकता हा प्रकार हाताळत आहोत असं सांगितलं आहे.