राखी सावंतचे वैवाहिक आयुष्य गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत येऊ लागले आहे. नुकतेच राखीच्या आईचे कॅन्सरच्या गंभीर आजाराने दुःखद निधन झाले मात्र याला जबाबदार तिने आदिल खान दुराणी याला ठरवले आहे. मराठी बिग बॉसच्या घरात जात असताना राखीने आईच्या उपचारासाठी आदिलजवळ १० लाखांचा धनादेश दिला होता. मात्र त्याने हे पैसे आईसाठी खर्च केले नसल्याचा आरोप आदिलवर लावला आहे. आदिल आपल्याला फसवतोय तो दुसऱ्याच एका मुलीच्या प्रेमात आहे असे ती वारंवार मिडियासमोर येऊन सांगत होती. याचाच उलट परिणाम म्हणून आदिल आपल्याला सोडून गर्लफ्रेंड कडे गेला आहे असा दावा राखीने मिडियासमोर केला आहे. मी मराठी बिग बॉसच्या घरात गेले तसा आदिल त्या मुलीसोबत फिरताना तिच्यासोबत रात्र घालवत होता, या सर्व गोष्टीचे पुरावे माझ्याकडे आहेत. त्या दोघांच्या विमानाची तिकिटं आणि काही फोटो मी जपून ठेवले आहेत.

आदिल आपल्याला फसवतोय हे राखी अनेकदा बोलली. यावरून तिने आदिलला पुन्हा त्या मुलीकडे जाणार नाही अशी कुराणवर हात ठेवून शपथ घ्यायला लावली होती. राखीने हा व्हिडीओ मिडियासोबत शेअर केला होता. त्यात आदिल राखीवर चिडताना दिसला. त्याच्या अशा वागण्यावरून राखी बरोबर आहे आणि आदिल खूप मतलबी आहे अशा प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. राखीचा वापर करून आदिलने या इंडस्ट्रीत नाव कमावले असे राखी म्हणते. आदिल खूप श्रीमंत आहे त्याची ती गर्लफ्रेंड सुद्धा खूप श्रीमंत आहे मी गरीब असले तरी माझं मन मात्र खूप मोठं आहे असेही ती मीडियाशी बोलताना म्हणाली होती. या दरम्यान हे आरोप होत असताना राखीने आदिलच्या गर्लफ्रेंडचे नाव जाहीर करणे टाळले होते. आदिलसोबत लग्न झाल्यानंतर त्याची दोन तीन अफेरर्स मी तोडली होती. पण आता जी त्याला आपल्या जाळ्यात ओढत आहे तिचे नाव मी मुद्दाम जाहीर करण्याचे टाळते. ती मुलगी याच इंडस्ट्रीत गेल्या सात आठ वर्षांपासून स्ट्रगल करत आहे मात्र तिला मी नाव घेऊन मोठं करू इच्छित नाही. तिला असं वाटतं की मी तिचं नाव घेतलं तर तिला प्रसिद्धी मिळेल. मात्र काल राखीने तिच्या नावाचा खुलासा केलेला आहे. तनु चंदेल ही बॉलिवूड सृष्टीत आपली ओळख बनवू पाहत आहे तिने आदिलला आपल्या जाळ्यात ओढलंय असा आरोप लावत राखीने तनु उर्फ निवेदिता चंदेल सोबत आदिलचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

निवेदिता उर्फ तनु चंदेल ही मॉडेल तसेच चित्रपट मालिका अभिनेत्री आहे.फॅशनच्या दुनियेत तिने मोठं नाव कमावलं आहे. अनेक म्युजिक व्हिडिओमध्ये ती झळकली आहे. स्वतःच्या नावाने तिने कपड्यांचा ब्रँड बाजारात आणला असून तिच्या ब्रॅंडला सेलिब्रिटी विश्वात मोठी पसंती मिळाली आहे. तनु आणि आदिल गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत तिला या इंडस्ट्रीत प्रसिद्धी मिळवायची आहे म्हणून तिने आदिलला आपल्या जाळ्यात ओढलं आहे. यासंदर्भात तनूचे आणि माझे बोलणं झालं आहे ती माझ्या आदिलला माझ्यापासून हिरावून घेतीये असे ती मला बोलली होती तो कॉल मी रेकॉर्ड केलेला आहे. तनु बरोबरच आदिल कसा आहे याचा देखील राखीने आता उलगडा करण्यास सुरुवात केलेली आहे. आदिल फसवा मुलगा आहे म्हैसूरमध्ये असताना त्याने अनेक कारनामे केले आहेत. त्याच्यावर केस सुद्धा दाखल आहेत. माझी आई त्यांच्यामुळेच गेली असेही राखी आता बोलू लागली आहे.