या अभिनेत्रीच्या मृ त्यू प्रकरणी दादा कोंडके यांचे नाव गोवले गेले…डायरीमध्ये दादा कोंडके यांचा फोन नंबर पेनाने गोल

चंदेरी दुनियेत अनेक अनपेक्षित घटना घडत असतात. १९८१ साली मराठी चित्रपट अभिनेत्री पुष्पा भोसले ह ‘ त्या प्रकरणी दादा कोंडके यांचे नाव गोवण्यात आले होते. त्यावेळी हे प्रकरण खूप चर्चेत आले होते. पुष्पा भोसले यांच्या डायरीमध्ये दादा कोंडके यांचा फोन नंबर पेनाने गोल केला होता तेव्हा पोलिसांना दादा कोंडके यांच्यावर संशय आला. पण आपण पुष्पा भोसलेला गेली सहा महिने भेटलोच नव्हतो याचा खुलासा दादा कोंडके यांनी केला. यानंतर संशयाची सुई त्यांचे पती बाळासाहेब लाटकर यांच्याकडे वळली. हा तपास सुरू केल्यानंतर पुष्पा भोसले यांच्या खु’ ना’ चा उलगडा होत गेला. पुष्पा भोसले यांनी दादा कोंडके यांच्या एकटा जीव सदाशिव चित्रपटात काम केले होते.

केवळ एक अभिनेत्री म्हणून त्यांची मैत्री होती. एक गाव बारा भानगडी, बोट लावीन तिथे गुदगुल्या अशा चित्रपटात त्या सहाय्यक भूमिकेतही दिसल्या होत्या. पुष्पा भोसले ह्या कोल्हापूर येथे पार्वती टॉकीजच्या जवळ चाळीत एका पडक्या खोलीत राहत होत्या हौसाबाई भोसले यांनी पुष्पाचे पालकत्व स्वीकारले होते. किशोरवयात पुष्पा यांनी माणिक कलावंतीन यांच्याकडे नृत्य शिकल्या, दिसायला सुंदर असल्याने त्यांनी मराठी रंगमंचावर प्रसिद्धी मिळवली होती. चित्रपटात काम करत असतानाच बाळासाहेब रामराव लाटकर यांच्याशी त्यांनी प्रेमविवाह केला. बाळासाहेबांच्या वडिलांची कोल्हापुरात बरीच संपत्ती, विपुल शेती मालमत्ता तसेच स्थावर मालमत्ता होती. बाळासाहेब पुष्पाच्या प्रेमात पडले पण बाळासाहेबांच्या कुटुंबाने त्यांच्या प्रेमाला आक्षेप घेतला, ज्याचा परिणाम असा झाला की लाटकरांचा हा विवाह नरसोबावाडी येथे साध्या पद्धतीने पार पडला. मात्र लाटकर कुटुंबातील सदस्य लग्नाला उपस्थित राहिले नाहीत. पुष्पा काही वर्षे आनंदी सधन वैवाहिक जीवन जगत होत्या. सुरुवातीला त्यांना एका बाळाचा आशीर्वाद मिळाला जो त्याच्या जन्माच्या पहिल्या आठवड्यात म’ र ण पावला. लग्नानंतर पुष्पाने तिची अभिनयाची कारकीर्द सोडून दिली, पण काही कारणास्तव ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’ या मराठी चित्रपटात त्यांनी दुय्यम भूमिका साकारली.

बाळासाहेब यांना मिळालेल्या मालमत्तेत त्यांनी स्वतःचे लॉज उभारले आणि एका भाड्याच्या बंगल्यात ते दोघे राहायला गेले. बंगल्याचे मालक पाटील हे पुष्पाच्या वागण्याला त्रासले होते, कारण तिच्या नवऱ्याच्या अनुपस्थितीत काही अज्ञात लोक तिला भेटायला येत असत. अशा वर्तनामुळे आपल्या प्रतिष्ठेवर विपरीत परिणाम होईल, अशी भीती व्यक्त करून पाटील यांनी बाळासाहेबांना बंगला रिकामा करण्याची विनंती केली होती. या बातमीने बाळासाहेब संतापले, त्यांनी पुष्पाला या प्रकरणाबद्दल फटकारले. या आरोपांमुळे पुष्पा घाबरल्या आणि हौसाकडे राहायला गेल्या. त्यानंतर काही दिवसातच बाळासाहेबांनी पुष्पाला मनवण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्याच एका लॉजवर बोलावून एकत्र दिवस घालवला. दोन दिवसांनी म्हणजेच ५ जानेवारी १९८१ रोजी लॉजमध्ये पुष्पाने आ त्म ‘ह ‘त्या केली असल्याचे समोर आले. मात्र तापसानंतर बाळासाहेबांनीच पुष्पाचा खू’ न केल्याचे उघडकीस आले होते.