स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेत आता रंजक ट्विस्ट आलेले पाहायला मिळत आहेत. लवकरच अरुंधती आशुतोषला प्रेमाची कबुली देणार असल्याने अनिरुद्ध मात्र चांगलाच संतापलेला पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांना मात्र हा ट्विस्ट मालिकेत कधी येतोय याची उत्सुकता आहे. त्याअगोदर मालिकेतील अभिनेत्री पूनम चांदोरकर हिच्या बद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात. आई कुठे काय करते मालिकेत पूनम चांदोरकर यांनी विशाखाची भूमिका साकारली आहे. या भूमिकेने पूनम चांदोरकरला मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. पूनम चांदोरकरने तिच्या कारकिर्दीची सुरुवात अँकर म्हणून केली होती. तिने अनेक कार्यक्रम होस्ट केले ज्यात तिने भारतीय चित्रपट उद्योगातील प्रसिद्ध कलाकारांच्या मुलाखती घेतलेल्या पहायला मिळाल्या.

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्री पूनम चांदोरकर हिने गश्मीर महाजनी सोबतही काम केले आहे. याशिवाय मराठी वृत्तवाहिनीच्या क्राईम फाइलमध्ये देखील ती क्राइम पेट्रोलच्या मराठी आवृत्तीच्या भागांमध्ये आणि नंतर हिंदी क्राईम पेट्रोलमध्ये देखील दिसली होती. देवा तुला शुद्ध कुठे या मराठी लघुपटातही ती झळकली आहे. छोट्या मोठ्या भूमिका साकारत पूनम ने मराठी सृष्टीत स्वतःची ओळख बनवली. यातूनच तिला दाक्षिणात्य चित्रपटात सुद्धा विजय सेथुपती यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. “आई आई कुठे काय करते ” या मालिकेत कांचन साकारणारी अभिनेत्री अर्चना पाटकर आणि पूनम चांदोरकर ह्या दोघींचा चेहरा इतका सारखा वाटतो कि सुरवातीला अनेक लोक पूनमला तुम्ही खरंच मायलेकी आहात का असा प्रश्न देखील विचारात होते. पण तस काही नाहीये हि ती उघड करायची. “आई आई कुठे काय करते ” मालिकेत सीन करताना ह्या दोघींचं चांगलं बॉन्डिंग जुळून येत त्यामुळेच त्यांचे सीन देखील तितकेच चांगले होताना पाहायला मिळतात. अभिनेत्री पूनम चांदोरकरच्या मुलीने देखील अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले आहे.

आर्या चांदोरकर ही पूनम चांदोरची मुलगी आहे. आर्याला अभिनयाची आवड असून कॉलेजमध्ये असताना तिने नाटकातून काम करण्यास सुरुवात केली. आईच्या पावलावर पाऊल टाकत आर्याने सुद्धा जाहिरात क्षेत्रात पदार्पण केलेले आहे. स्वप्नील जोशी आणि पल्लवी पाटील या जाहिरातीत प्रमुख भूमिका साकारताना दिसले होते. पहिल्याच प्रोजेक्टमधून स्वप्नील जोशी सोबत स्क्रीन शेअर करायला मिळाल्याने आर्या खुपच खूष झाली होती. हा प्रोजेक्ट म्हणजेच टिव्हीसीची आय आय बी फास्ट ही ऍड होय. या ऍडच्या माध्यमातून आर्या प्रथमच टीव्हीवर झळकली होती. आर्याला अभिनयाची पार्श्वभूमी असल्याने ती लवकरच या क्षेत्रात निश्चित असे यश गाठेल अशी आशा आहे. अभिनयाची उत्तम जाण असलेल्या आर्या चांदोरकर हिला लवकरच नवनवीन प्रोजेक्ट मधून झळकण्याची संधी मिळो हीच सदिच्छा.