Breaking News
Home / अध्यात्म / प्रार्थना बेहरेच्या आयुष्यातील हा आहे कृष्ण पहा हा मुलगा तिच्यासाठी आहे खूपच खास

प्रार्थना बेहरेच्या आयुष्यातील हा आहे कृष्ण पहा हा मुलगा तिच्यासाठी आहे खूपच खास

गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने अनेक कलाकार त्यांच्या दहीहंडी किंवा कृष्ण जन्माष्टमी सणाच्या आठवणी ताज्या करत आहेत. प्रार्थना बेहरेनेही एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने तिच्या आयुष्यातील कृष्ण कोण हे सांगत त्याच्यासोबतचे आनंदाचे क्षण शेअर केले आहेत. तुमच्या आयुष्यात कृष्णाची जागा कुणी घेतलीय ? तुमचं उत्तर काहीही असो, पण अभिनेत्री प्रार्थना बेहरेच्या आयुष्यातही एक कृष्ण आहे. तिचा हा कृष्ण तिने सर्वांसमोर आणला आहे. कोण आहे तो… ? त्यासाठी तिच्या इन्स्टापोस्टवर क्लिक केलच पाहिजे. सेलिब्रेटी कलाकार त्यांच्या आयुष्यातील दहीहंडी, कृष्णजन्माष्टमी सणांच्या आठवणी ताज्या करत आहेत. स्वप्नील जोशीने साकारलेल्या कृष्णाची भूमिका आजही लक्षात आहे.

prathna behre mom and dad
prathna behre mom and dad

अभिनेता विवेक सांगळे याने लालबागमध्ये लहानपणी साजरी केलेली दहीहंडी आठवणीतून जागवली. याच पंक्तीत प्रार्थना बेहरे हिने एक व्हिडिओ शेअर करत चक्क ती आयुष्यात ज्याला कृष्णा मानते त्याच्यासोबतचे खास क्षण शेअर केले आहेत. हा कृष्ण दुसरा तिसरा कुणी नसून तिचा लाडका भाचा आहे. प्रार्थनाच्या या व्हिडिओला खूप लाइक मिळत आहेत. प्रार्थनाला सख्खा भाऊ नाही. प्रार्थना आणि तिची मोठी बहिण अशा दोघीच आहेत. एक भाऊ असावा असं तिला लहानपणी नेहमी वाटायचं. त्या भावात तिला कृष्ण दिसायचा. पण ही उणीव तिच्या बहिणीला मुलगा झाला तेव्हा भरून निघाली. मग काय तेव्हापासून या लाडक्या भाच्यालाच प्रार्थना कृष्णाची उपमा देते. प्रार्थनाच्या या भाच्याचं नाव आहे वंशिल. ती प्रेमानं त्याला वनू म्हणते. तर वनूसोबत धमाल करतानाचा व्हिडिओ प्रार्थनाने शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये दोघंही खूपच मजा करत आहेत. व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये प्रार्थनाने असं लिहिलं आहे की, मी लहानपणी आईकडे भाऊ मागायचे. पण ते स्वप्नं काही पूर्ण झालं नाही. मग मी ताईकडे लकडा लावला की लवकरात लवकर मला भाचा दे. मोठया बहिणीच्या पोटी वंशिल आला आणि भाचा कमी मला भाऊ मिळाल्यासारखंच वाटलं.

prarthna behre sister
prarthna behre sister

त्याचा जन्म झाल्याचा क्षण मला आजही आठवतोय. आता तो मोठा झालाय, दिवस कसे भुर्रकन उडून गेले. पण तू खूप प्रगती कर. तुझी सगळी स्वप्नं पूर्ण होऊ दे, तू जे ठरवलं आहेस ते सगळं साध्य करण्याचं बळ तुला मिळू दे. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज लागेल, तेव्हा मला हाक मार, ती तुझ्याजवळ असेन. प्रार्थना नेहमीच तिचे व्हिडिओ शेअर करत चाहत्यांशी कनेक्ट असते. सध्या ती माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहा चौधरीच्या भूमिकेत दिसत आहे. सेटवरील धमाल मस्तीचे रिल्सही शूट करत असते. तिच्या या व्हिडिओंच्या गर्दीत वंशिलला तू माझा कृष्णा म्हणत शेअर केलेल्या व्हिडिओवर चाहत्यांकडून कमेंटची
रांग लागली आहे. असो अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिला तिच्या मालिकेसाठी आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *