अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशलमीडियावर खूपच चर्चेत असते. कधी आकर्षक फोटो शेअर करून तर कधी तिच्या सौंदर्याची गुपितं उघड करत ती चाहत्यांशी संवाद साधते. नुकताच तिने तिच्या कुटुंबासोबत निवांत वेळ घालवला. हा व्हिडिओ शेअर करत प्राजक्ताने तिच्या सौंदर्याचं आणखी सत्य समोर आणलं आहे. प्राजक्ता नेहमीच तिच्या नितळ त्वचेचं रहस्य सांगत असते. लॉकडाउनकाळात प्राजक्ताने तिच्या इन्स्टापेजवरून चाहत्यांना ग्लो स्किनसाठी खास टिप्स दिल्या होत्या. योगाप्रेमी असलेली प्राजक्ता फिट राहण्यासाठी काय आहार घेते याचीही माहिती काहीही न लपवता ती शेअर करते. त्यामुळे प्राजक्ताच्या टिप्स फॉलो करण्यासाठी तिच्या चाहत्यांच्या यादीतील तरूणी कायम तयार असतात.

आता फॅमिलीसोबत लगोरी खेळता खेळता प्राजक्ताने तिच्या तुकतुकीत स्किनचं रहस्य सांगितल्यानं हा व्हिडिओ व्हायरल होतोय. वेगवेगळया लुकमधील फोटो शेअर करत अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशलमीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह असते. मालिका, सिनेमा, वेबसीरीज, सूत्रसंचालन, नाटक इतकच नव्हे तर कवितालेखन या क्षेत्रातील प्राजक्ताची मुशाफिरी तिच्या चाहत्यांनाही खूप आवडते. सध्या प्राजक्ता इतकी बिझी आहे की थोडी जरी सुट्टी मिळाली की ती पुण्यातील तिच्या घराची वाट धरते. नुकताच तिने सोशलमीडियावर फॅमिलीसोबत आनंद लुटत असल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमधून प्राजक्ताने तिच्या सौंदर्याचा आणखी पत्ता उघडला आहे. या व्हिडिओमध्ये प्राजक्ता तिच्या फॅमिलीसोबत भर पावसात लगोरीचा डाव मांडताना दिसत आहे. या व्हिडिओला तिने सुरेख कॅप्शन दिली आहे. यामध्ये तिने असं म्हटलं आहे की लगोरी, हा आमच्या कुटुंबाचा आवडता खेळ झाला आहे. भर पावसात ३ तास वेड्यासारखे खेळत होतो. त्यामुळे अजूनही अंग दुखतय. पण हरकत नाही, माती गवतावर खेळल्यामुळे माझी स्किन अजून जास्त ग्लो झाली आहे. कामाच्या निमित्ताने प्राजक्ताने आता मुंबईत घर घेतलं असलं तरी प्राजक्ता मुळची पुणेकर आहे. पुण्यातील घराचे फोटो तिने यापूर्वीही शेअर केले आहेत. नुकताच तिने कामातून ब्रेक घेत पुण्यातील घरी मुक्काम केला.

यावेळी संपूर्ण कुटुंबासोबत तिने लगोरीचा डाव मांडला. या खेळातील धमाल तिने व्हिडिओतून शेअर केली आहे. प्राजक्ता माळीला जुळून येती रेशीमगाठी या मालिकेने लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिचा नायक होता ललित प्रभाकर. ललितसोबत प्राजक्ताने हॅम्पी हा सिनेमाही केला. गेल्याच महिन्यात प्राजक्ताची रानबाजार ही वेबसीरीज झळकली. या सीरीजमध्ये प्राजक्ताने केलेली देहविक्री करणाऱ्या महिलेची भूमिका चांगलीच गाजली. तिचा वाय हा सिनेमाही चर्चेत आला. प्राजक्त प्रभा हा तिचा काव्यसंग्रहही प्रकाशित झाला आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोची निवेदिका म्हणून प्राजक्ताची जोरदार हवा आहे. इतक्या सगळ्या कामाच्या व्यापात प्राजक्ताने कुटुंबासोबत केलेली धमाल आणि माती गवतात खेळल्याने स्किन ग्लो झाल्याचं रहस्य सांगणारा हा व्हिडिओ खूपच गाजतोय.