सतत एकामागून एक काम केल्यानंतर प्रत्येक माणसाला एक विसावा हवा असतो. अशा वेळेला कामातून विश्रांती मिळाली रे मिळाली ती लोक पर्यटनाला बाहेर पडतात . सेलिब्रिटी कलाकार यांना तर अशा ब्रेकची जास्तच गरज असते. गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या वेब सिरीज, सिनेमे, निवेदन यामध्ये बिझी असलेली अभिनेत्री प्रार्थना माळी हीदेखील सध्या हिमाचल प्रदेशमध्ये पर्यटनाचा आनंद लुटत आहे. गंमत म्हणजे ती ट्रिपसाठी एकटीच गेली आहे . हिमाचल प्रदेश मधील अनेक फोटो आणि व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर देखील केले आहेत. पण गेल्या आठवडाभरापासून हिमाचल प्रदेश मध्ये धमाल करत असलेल्या प्राजक्ताला अचानक तिथून पळून यावसं का वाटतंय ! असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. असं काय झालं की तिने कधी एकदा इथून पळून येते असे लिहीत एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या तिच्या सहलीपेक्षा तिची ही पोस्ट जास्त व्हायरल होतेय.

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं कामातून ब्रेक घेतला असून ती एकटीनं हिमाचल प्रदेशमध्ये फिरत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता माळी ही तिच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कामांमुळे चर्चेत आहे. रान बाजार या वेबसिरीज मध्ये प्राजक्ताने केलेल्या बोल्ड भूमिकेचं कुणी कौतुक केलं तर यावरून तिला काही जणांनी ट्रोलही केलं. पण कलाकार म्हटलं की अशा भूमिका केल्या पाहिजेत असं मत व्यक्त करत प्राजक्ताने या सगळ्या परिस्थितीला धैर्याने तोंड दिलं. चंद्रमुखी सिनेमातील प्राजक्ताची सवाल जवाब लावणी देखील खूपच गाजली.लवकरच वाय या सिनेमात एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. त्यापूर्वी लकडाउन या सिनेमातूनही ती अंकुश चौधरी याच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसली. गेल्या साडेतीन वर्षापासून प्राजक्ता माळी हास्य महाराष्ट्राची हास्य जत्रा या कॉमेडी शोचं निवेदन करत आहे. या सगळ्या व्यस्त कामातून प्राजक्ताला स्वतःला वेळ देण्याची गरज होती आणि जेव्हा महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोमधून तिला ब्रेक मिळाला तेव्हा तिने हिमाचल प्रदेशला जाण्याचा निर्णय घेतला. प्राजक्ता पहिल्यांदाच सोलो ट्रीपला गेली आणि तिथे ती जीवाचं हिमाचल प्रदेश करत असल्याचं फोटो आणि व्हिडिओ मधून चाहते पाहतच आहेत.

प्राजक्तानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट वाचून तिचे चाहते चांगलेच बुचकळ्यात पडले आहेत. प्राजक्तानं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘ कुठल्याही सुंदर प्रदेशाचा मी जास्तीत जास्त पाच-सहा दिवस आनंद घेऊ शकते नंतर (काम नसेल तर) मला महाराष्ट्राची कडकडून आठवण यायला लागते…हो आत्ता पळून यावं इतकी आठवण येतेय… देवा…कसं होणार माझं…’ असं म्हणत तिनं पोस्ट शेअर केलीय. एकीकडे चाहते प्राजक्ताच्या या पोस्टवर कमेंट करत आहेत तर दुसरीकडे काही चाहत्यांनी प्राजक्ताने व्यक्त केलेली ही भावना खरं असल्याचेही म्हटलं आहे. अनेकदा आपण आपलं घर, आपलं गाव सोडून दुसऱ्या देशात किंवा राज्यात जातो. सुरुवातीला तो आनंद आणि उत्साह खूप असतो. परंतु काही दिवसानंतर मात्र आपल्याला आपल्या घरची ,गावची आठवण यायला लागते. प्राजक्ताच्या बाबतीतही सध्या हिमाचल प्रदेशाच्या डोंगररांगांमध्ये अशाच प्रकारची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे चाहत्यांपासून आणि तिच्या कामापासून लांब गेलेली प्राजक्ता लवकरच परत येईल आणि स्क्रीनवर दिसेल हा आनंद तिच्या चाहत्यांना झाला आहे.