
एक दोन मालिका गाजवल्यानंतर मराठी सृष्टीतील बहुतेक अभिनेत्री हिंदी सृष्टीकडे वळलेल्या पाहायला मिळतात. यात प्रामुख्याने स्वरदा ठिगळे, क्षिती जोग, कादंबरी कदम , पूर्वा गोखले यांनी नावे घ्यावी लागतील. महत्वाचं म्हणजे पूर्वा गोखले हिने हिंदी मालिका सृष्टीत जाऊन एक वेगळी ओळख निर्माण केलेली पाहायला मिळाली. स्वराज्य रक्षक संभाजी, कुलवधू, भयभीत अशा मालिका आणि चित्रपटांमधून अभिनेत्री पूर्वा गोखले हिने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. कुलवधू मालिकेनंतर मराठी सृष्टीपेक्षा पर्वा गोखले हिंदी मालिका सृष्टीत चांगलीच रुळलेली पाहायला मिळाली. कहानी घर घर की, कोई दिल में है, तुझसे है राबता अशा हिंदी मालिकांमधून पूर्वाला महत्वाच्या भूमिका मिळत गेल्या.

तुझसे है राबता या मालिकेत तिने अनुप्रिया देशमुखची व्यक्तिरेखा साकारली. या भूमिकेने पूर्वा हिंदी सृष्टीत खूप लोकप्रिय झाली. जवळपास १३ वर्षानंतर भयभीत चित्रपटातून ती सुबोध भावे सोबत पुन्हा एकदा झळकली होती. स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून पूर्वाने महाराणी सईबाईंची भूमिका साकारली होती. २००७ सालच्या कुलवधू या मालिकेत पूर्वाने देवयानीची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली होती. पूर्वा गोखले ही केदार गोखले सोबत विवाहबद्ध झाली. केदार बिजनेसमन आहे अनुष्का आणि काशवी या त्यांच्या दोन मुली. पूर्वा गोखले ही ज्येष्ठ अभिनेत्री कांचन गुप्ते यांची लेक आहे. कांचन गुप्ते यांनी रंगभूमीवरून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. सुरुवातीला त्यांनी नोकरी सांभाळून नाटकातून काम करण्यास सुरुवात केली. नाटक, चित्रपट आणि मालिकेतून त्या महत्वाच्या भूमिकेत झळकल्या आहेत. घाडगे अँड सून, माझ्या नवऱ्याची बायको, जावई विकत घेणे आहे अशा मालिकेत त्या अभिनय साकारताना दिसल्या. झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेने जवळपास ५ वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

या मालिकेत कांचन गुप्ते यांनी महाजनी काकूंची भूमिका साकारली होती. या मालिकेने सर्वच कलाकारांना चांगली लोकप्रियता मिळवून दिली होती. पण पुढे टीआरपी मिळतो म्हणून मालिका तशीच चालू ठेऊन नवनवे पात्र भरती केले आणि मालिका प्रेक्षकांना नकोशी झाली. पण कांचन गुप्ते यांचा अभिनय प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. आपल्या आईच्याच पावलावर पाऊल टाकत पूर्वा देखील अभिनय क्षेत्रात दाखल झाली. मराठी मालिकेची नायिका ते हिंदी मालिका सृष्टीत चरित्र अभिनेत्री अशी तिने स्वतःची ओळख मिळवली. हिंदी मालिका सृष्टी गाजवत असताना तिने स्वराज्यरक्षक संभाजी या मराठी मालिकेत पुनःपदार्पण केले. मराठी सृष्टीतील बऱ्याचशा कलाकारांनी हिंदी मालिकेत जॅम केले आहे त्यात पूर्वाने देखील ही ओळख जपली आहे. या दोघी मायलेकींना त्यांच्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.