झी मराठी वरील हृदयी प्रीत जागते या मालिकेतील वीणा आणि प्रभास यांची जुळून आलेली प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेतून पूजा कातूर्डे प्रथमच झी मराठी मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. याअगोदर पूजाने गणपती बाप्पा मोरया, विठू माऊली, बाकरवडी, सांग तू आहेस का, बबन अशा मालिकांमधून आणि चित्रपटातून काम केलेले आहे. पूजा उत्तम अभिनेत्री आहे हे तिच्या विविधांगी भूमिकेतून समजले आहे. मात्र तिची भन्नाट कल्पना शक्ती पाहून तिच्या मित्राने तिला वाढदिवसाच्या हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहे. काही दिवसांपूर्वीच पुजाचा वाढदिवस होता. या वाढदिवसाच्या दिवशी तिचा मित्र म्हणजेच अभिनेता चैतन्य सारदेशपांडे याने पूजाच्या अनेक गोष्टींची पोलखोल केलेली आहे.

एक पोस्ट लिहीत चैतन्यने तिच्या भन्नाट कल्पनाशक्तीला सलाम केलेला आहे. पूजाने आपल्या आयुष्यात अनेक गैरसमज करून घेतलेले आहेत आणि त्यावर तिचा दृढ विश्वास देखील आहे. चैतन्य आपल्या पोस्टमध्ये पुजाचे वर्णन करताना म्हणतो आहे की, ‘सोनम कपूरची हाईट साडेसात फूट आहे असा समज असणारी…रोनाल्डो आणि मेस्सी हे भारताकडून हॉकी खेळतात हे पटवून देणारी… नुकतेच प्रसिद्ध अभिनेते ‘के’दार खान निधन पावले एवढा कॉन्फिडन्स असणारी…मोदी नक्की पंतप्रधान आहेत की राष्ट्रपती हे माहीत नसलेली…हैद्राबादला जायला पासपोर्ट लागतो का असा प्रश्न विचारणारी…एखाद्या जागेचा भाव ५००० रु मीटर असं सांगणारी…’इशारों फुल बरसाओ’ असं गाणं म्हणणारी, जीचा नंबर माझ्या मोबाईल मध्ये ‘स्त्री’ आणि ‘हस्तर’ नावाने सेव्ह आहे…आलिया पेक्षा जरा कमी ढ असलेली…अशी पूजा आजच्या दिवशी काही वर्षांपूर्वी ढगातून डोक्यावर पडली होती म्हणे…आज ती ३ वर्षांची झाली आहे. हॅप्पी बर्थडे, खूप प्रेम इतकीच इनोसेंट प्युअर ऍट हार्ट आणि माठ रहा आयुष्यभर. आम्ही तुझे असेच किस्से सांगत राहू सगळ्यांना कारण तुला त्रास देण्यात जी मज्जा आहे ती जगात दुसऱ्या कशातच नाही. इतके सगळे किस्से करून सुद्धा ती म्हणते…’मी भारिये..

अनव्हिजिबल क्रोन आहे माझ्या डोक्यावर. (हिला सांगा कोणीतरी इनव्हिजिबल असतं गं ते)… मागच्या वर्षी पोस्टमध्ये मी खूप वाईट बोललो होते तुझ्या बद्दल …तू हैद्राबादला जायला पासपोर्ट लागतो का हे विचारलं होतंस…हे असं मी डायरेक्ट पोस्ट करायला नको होतं…पण मागच्या वर्षी जे झालं ते झालं आणि ह्या एका वर्षात तू अजून कैक किस्से केले असले तरी मी आज ते लिहिणार नाहीये…अगदी तू डबल डेकर बसमध्ये वरच्या मजल्यावरपण ड्रायव्हर असतो का हे विचारलंस हे सुद्धा मी लिहिणार नाहीये. किंवा तू तानाजी खिंड लढवत होता असं म्हणालीस तरी मी ते पोस्ट करणार नाहीये’….वाढदिवसाच्या अशा भन्नाट शुभेच्छा देत चैतन्य पुढे असेही म्हणतो की, ‘असेच किस्से करत राहा…तुझे किस्से विकुंच घर चालवायचं ठरवलंय मी…आणि तू कशीही वागलीस तरी माझ्यासाठी तू तेवढीच निरागस असणारेस, खूप जास्त प्रेम आणि…’ त्याने लिहलेली हि पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.