Breaking News
Home / जरा हटके / अभिनेत्री नेहा पेंडसे हिची बहीण देखील आहे मराठी अभिनेत्री

अभिनेत्री नेहा पेंडसे हिची बहीण देखील आहे मराठी अभिनेत्री

अभिनेत्री नेहा पेंडसे मराठी मालिका तसेच चित्रपट अभिनेत्री म्हणून सर्वांच्या परिचयाची आहे. लवकरच तिचा “जून ” हा मराठी चित्रपट प्लॅनेट मराठी ओटीटी वरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेहा पेंडसेने आपल्या अभिनयाचा ठसा केवळ मराठी सृष्टीपुरताच मर्यादित ठेवला नाही. भाभीजी घर पर है, फॅमिली टाइम विथ कपील, तुमसे अच्छा कौन है, बाळकडू, सुरज पे मंगल भारी, नटसम्राट, एंटरटेनमेंट की रात या आणि अशा कित्येक रियालिटी शो मालिका आणि चित्रपटातून ती प्रेक्षकांसमोर आली आहे. एक ग्लॅमरस पण तितकीच बोल्ड अभिनेत्री म्हणूनही तिला जास्त ओळखले जाते.

actress neha pendse family
actress neha pendse family

गेल्या वर्षी नेहा शार्दूल सिंग बयास सोबत विवाहबद्ध झाली होती. तिच्या या लग्नाची मीडियात जोरदार चर्चा पाहायला मिळाली होती. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की नेहाची बहीण देखील हिंदी मराठी सृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे तिचे नाव आहे “मीनल पेंडसे”. मीनल पेंडसे हीने १९९९ सालच्या ‘बिनधास्त’ या मराठी चित्रपटात काम केले होते. मयुरी आणि वैजयंती या दोघी मैत्रिणींना त्यांच्या कॉलेजची मैत्रीण शीला खुनाच्या आरोपात कसे फसवते हे दर्शवले होते…याच शिलाची भूमिका चित्रपटातून अभिनेत्री मीनल पेंडसेने निभावलेली होती. या आरोपांमुळे शीला एका फार्महाऊसमध्ये लपून बसलेली असते तिचा शोध मयुरी आणि वैजयंती घेत असतात. अर्थात या सर्व घटनांमागे एसीपी निशा मॅडमचा हात असतो याचा उलगडा चित्रपटाच्या अगदी शेवटी होतो. या चित्रपटानंतर मीनल पेंडसे २००२ सालच्या आधारस्तंभ या आणखी एका मराठी चित्रपटात झळकली. परंतु इथे ती फारशी रमली नाही. मस्ती चित्रपट, किस देश में है मेरा दिल, अमिता का अमित, मी आज्जी और साहेब या हिंदी मालिका तिने अभिनित केल्या.

neha pendse sister
neha pendse sister

त्यामुळे मराठी सृष्टीपेक्षा हिंदी मालिकांमधून तिच्या अभिनयाला जास्त वाव मिळत गेला आणि इथेच ती जास्त रमत गेली असे म्हणायला हरकत नाही. मधल्या काळात तिने नंदकिशोर कुमावत यांच्याशी विवाह केला. एका विवाहसंस्थेत मिनलने आपले नाव नोंदवले होते तिथेच तिने नंदकिशोर यांचे प्रोफाईल पाहिले. पहिले लग्न नॉन ब्राह्मण व्यक्तीशी झाले होते आणि आता हे दुसरे लग्नही नॉन ब्राह्मण व्यक्तीशी त्यामुळे तिच्या या दुसऱ्या लग्नाला घरच्यांकडून थोडीशी नाराजी होती. मात्र पहिल्याच भेटीत नंदकिशोरचा स्वभाव मीनलला इतका आवडला की तिने या लग्नाला लगेचच आपला होकार कळवला. आज मीनल आणि नेहा मराठी सृष्टीतला या बहिणी हिंदी सृष्टीतही चांगल्याच ओळखल्या जातात हे बहुतेकांना परिचयाचे नसावे. तशा या दोघी मिडियासमोरही फारशा कधी एकत्रित पाहायला मिळाल्या नाहीत हेच यामागचे मुख्य कारण आहे…

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *