मराठी बिग बॉसच्या घरात लवकरच वाईल्ड कार्ड द्वारे एका नव्या सदस्याची एन्ट्री होत आहे. आजवर आठवड्याच्या एलिमीनेशनमध्ये, अक्षय वाघमारे, सुरेखा कुडची, आदीश वैद्य यांना बिग बॉसच्या घरातून एक्झिट झाली आहे. शिवलीला पाटील याही काही काळ बिग बॉसच्या घरात राहिल्या मात्र एलिमीनेशन होण्यागोदरच त्यांनी घरातून काढता पाय घेतला. त्यामुळे आता बिग बॉसच्या घरात राडा घालण्यासाठी आता नव्या सदस्याची एन्ट्री करण्यात येत आहे. सततच्या वादामुळे बिग बॉसचा तिसरा सिजन प्रेक्षकांना रुचला नाही शिवाय काहीतरी एक्साईटमेंट हवी या हेतूने आदिश वैद्य ची वाईल्ड कार्ड द्वारे एन्ट्री करण्यात आली होती.

मात्र काही दिवसातच त्याला बिग बॉसच्या घरातून बाहेर निघावे लागले. खरं तर त्याच्या अशा अचानक जाण्याने प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली होती. असे असले तरी आता नव्या सदस्याच्या एंट्रीमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढत चालली आहे. बिग बॉसच्या घरात नव्याने दाखल होत असलेली सदस्य आहे अभिनेत्री “नीता शेट्टी”. नीता शेट्टी ही हिंदी मालिका अभिनेत्री आहे. हिंदी सृष्टीत नाव कमावलेल्या नीता शेट्टी ने मराठी चित्रपट क्षेत्रातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ममता, तुम बिन जाऊं कहां, बनू मै तेरी दुलहन, मानो या ना मानो, ढुंढ लेगी मंजिल हमें, सीआयडी, क्राईम पेट्रोल अशा अनेक हिंदी मालिकांमधून तिने विविधांगी भूमिका बजावल्या आहेत. मराठी चित्रपटात देखील तिला सुबोध भावे, स्वप्नील जोशी सोबत झळकण्याची संधी मिळाली आहे. फुगे, सर्व लाईन व्यस्त आहे, तुला कळणार नाही अशा काही मराठी चित्रपटात ती महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाली. गंदी बात या वेबसिरीजमधून ती प्रेक्षकांसमोर आली होती. फुगे हा तिने साकारलेला पहिला मराठी चित्रपट ठरला होता.

आता वाईल्ड कार्ड एन्ट्री द्वारे नीता शेट्टी बिग बॉसच्या घरात राहून कसा खेळ खेळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तूर्तास बिग बॉसच्या घरात ए आणि बी टिम च्या सदस्यांमध्ये टास्क खेळण्यावरून चुरस पाहायला मिळाली होती त्यामुळे नीता या घरात येऊन कोणाला सपोर्ट करणार आणि कोणाला बाहेरचा रस्ता दाखवणार हे पाहावे लागेल शिवाय सदस्यांसोबत ती जुळवून घेणार की नाही हे देखील लवकरच स्पष्ट होईल. अगोदरच्या सदस्यांच्या ती वरचढ ठरणार की आणखी काय वेगळे घडणार हे येत्या काही दिवसातच बिग बॉसच्या घरातून प्रेक्षकांना कळेल. तूर्तास नीता शेट्टीच्या एंट्रीने तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. ती या मराठी असली तरी मराठी भाषेवर तीच चांगलं प्रभुत्व आहे हे देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हिंदी मालिकांत ती प्रसिद्ध आहेतच पण मराठी चित्रपटात काम करून तिने मराठी प्रेक्षक देखील आपलेसे केलेला पाहायला मिळाला. तिचे बिग बॉसच्या घरात येण्याने तिच्या मराठी चाहत्यांना नक्कीच आनंद झालेला आहे. घरटी ती चांगला खेळ कारेन आणि घरात टिकून राहील अशी आशा आहे.