७० ते ८० च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपट देऊन मुमताज यांनी लाखो चाहत्याना आपलेसे केले होते. गेल्या ३३ वर्षांहून अधिक काळापासून मुमताज अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत. मात्र आज वायाच्या ७५ व्या वर्षी सुद्धा त्या तेवढ्याच सुंदर दिसतात. नुकतेच सोनी वाहिनीने मुमताज यांना इंडियन आयडॉल १३ च्या मंचावर आमंत्रित केले होते. यावेळी धर्मेंद्र यांना देखील सोबत बोलावले होते. मुमताज आणि धर्मेंद्र यांनी या मंचावर येऊन एका रोमँटिक गाण्यावर डान्स सुद्धा केला हे पाहून उपस्थितांनी टाळ्या आणि शिट्ट्यांचा कडकडाट केला. या मंचावर मुमताज यांनी शम्मी कपूरला खूप मिस करत असल्याचे सांगितले. मुमताज कपूर घराण्याच्या सुनबाई झाल्या असत्या जर त्यांनी शम्मी कपूर यांना होकार दिला असता. मात्र हे घडू शकलं नाही.

इंडियन आयडॉल १३ च्या मंचावर मुमताज यांनी नुकतंच हा किस्सा आपल्या चाहत्यांशी आणि उपस्थितांशी शेअर केला आहे. आपल्या स्टाईलमध्ये त्यांनी हि सगळी हकीकत सांगितली आहे. झालं असं कि ७० च्या दशकात शम्मी कपूर यांना मुमताज आवडू लागल्या होत्या या दोघांनी ‘ब्रह्मचारी’ आणि ‘वल्लाह क्या बात है ‘ या चित्रपटातून एकत्रीत काम केले होते. दरम्यान शम्मी कपूर यांनी मुमताज यांना लग्नाची मागणी सुद्धा घातली होती. मात्र त्यावेळी मुमताज यांनी त्यांना स्पष्ट नकार दिला होता. ‘त्यावेळी मी फक्त १७ वर्षांची होते आणि लग्न करून घर संसार सांभाळायचं हे मला मुळीच मान्य नव्हतं. त्यामुळे मी शम्मी कपूर यांना स्पष्ट नकार दिला होता. कधी कधी त्यांची खूप आठवण येते, मी त्यांना खूप मिस करते परंतु ह्या गोष्टी नशिबात सुद्धा असाव्या लागतात, कितीतरी मुलींना लग्नासाठी ऑफर येतात त्यांच्यासोबत लग्न नाही झालं तर नाही झालं, यात मला मुळीच खेद वाटत नाही पण मी त्यांचा आजही तेवढाच आदर राखते ‘ असे म्हणत मुमताज शम्मी कपूर यांच्या आठवणीत भावुक झाल्या. ह्या आधी देखील मुमताज यांनी शम्मी कपूर यांच्याबद्दलचे अनेक किस्से आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलेले पाहायला मिळाले आहेत. एकेकाळी लाखो दिलोंकी धडकन असणाऱ्या मुमताज यांच्या आयुष्यातील घडामोडी सर्वानाच ऐकायला आवडतात.

राम और श्याम, ब्रह्मचारी, आदमी और इन्सान, खिलोना, तेरे मेरे सपने, नागीन, आईना, दो रास्ते अशा चित्रपटातून मुमताज यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवून दिली होती. राजेश खन्ना, शम्मी कपूर, फिरोज खान, अमिताभ बच्चन अशा दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी काम केले मात्र त्यांची आयुष्याची जोडी जुळली ती बीजनेसमन मयूर माधवानी यांच्याशी. नताशा आणि तान्या या दोन मुली त्यांना आहेत. नताशाचे लग्न बॉलिवूड अभिनेता फरदिन खान सोबत झाले. काही महिन्यांपूर्वी मुमताज यांना अभिनय क्षेत्रात पुन्हा पदार्पण कधी करणार याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी आपलं मत व्यक्त करताना म्हटलं होतं की, “मला माहित नाही, जर मला खरोखरच माझ्या हृदयाला स्पर्श करणारी भूमिका मिळाली, जी चांगली असेल आणि लोक प्रशंसा करतील, तर कदाचित मी करेन. पण प्रथम मला माझ्या पतीची परवानगी घ्यावी लागेल. जर त्याने मला परवानगी तर मी ते नक्की करेन.”