मला अनेकांनी सांगितलेलं इथे काम करू नको खूप प्रॉब्लेम आहेत तरीही मी …त्यादरम्यान माझ्या वडीलांचे शेवटचे दिवस होते
अभिनेत्री मृणाल दुसानिस ही जवळपास ४ वर्षानंतर भारतात परतली आहे. या ४ वर्षात तिने कलाक्षेत्राला खूपच मिस केलं आहे पण पुन्हा त्याच जोमाने काम करण्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे. नूरवीच्या जन्मानंतर मृणाल आता आई म्हणून आणखी एक जबाबदारी सांभाळत आहे. मधले चार वर्षे परदेशात असताना तिने कुटुंबासोबत छान वेळ घालवला. जरी अभिनय क्षेत्रात काम केलं नसलं तरी त्यावेळी तिने फॅमिली लाईफ एन्जॉय केली होती. पण आता मृणाल पती नीरज मोरेसह कायमची भारतात परतली आहे. आणि आता इथेच स्थायिक होण्याची तिची इच्छा आहे. परदेशातून परतल्यानंतर मृणालने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. त्यात तिने तिच्या प्रवासाबद्दल भरभरून बोललं आहे. हे मन बावरे या मालिकेचाही यावेळी तिने उल्लेख केलेला पाहायला मिळाला.
या मालिकेने मृणाल आणि शशांक केतकरला मोठी लोकप्रियता मिळवून दिली. पण मालिका संपल्यानंतरही निर्मात्याने आमचे पैसे दिले नाहीत अशा आशयाची पोस्ट त्यातील कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यात मृणाल, शशांक आणि शर्मिष्ठा राऊत यांचे नाव होते. मंदार देवस्थळी यांनी या मालिकेची निर्मिती केली होती. काम केल्याचे पैसे मिळत नसल्याने मृणाल दुसानिस हिने फोन करून , मेसेजेस करून या गोष्टीचा पाठपुरावा केला होता पण त्या पोस्टनंतरही त्याचा फायदा झाला नाही असे मृणाल इथे नमूद करते. खरं तर या गोष्टीला आता ४ वर्षे लोटली आहेत त्यामुळे मृणालने याबद्दल बोलण्यास टाळाटाळ केली पण त्यानंतर ती यावर बोलती झाली. मालिकेच्या दरम्यानच मृणालचे बाबा आजारी होते. मृणालला भेटण्याची त्यांनी अनेकदा इच्छा व्यक्त केली पण व्यस्त शेड्युल मुळे मृणालला त्यांना भेटता नाही आले, त्यावेळी त्यांचे शेवटचे दिवस होते याची तिला आणि तिच्या बाबांनाही मुळीच कल्पना नव्हती.
पण ज्या मालिकेत आपण जीव ओतून काम करतोय, माझ्या कुटुंबाला मला वेळ देता येत नव्हता त्या कामाचे पैसे न मिळाल्याने मृणाल खुपच हर्ट झाली होती. त्यावेळी शशांकला त्यांनी पूर्ण पैसे दिले होते. फक्त त्याचा टीडीएस दिला नव्हता पण मग माझं असं झालं होतं की कमीतकमी तुम्ही आम्हाला अर्धे तरी पैसे द्यायला हवे होते. मला अनेकांनी सांगितलं होतं की तिथे काम करू नकोस असा असा प्रॉब्लेम आहे. पण जेव्हा मी या इंडस्ट्रीत आले तेव्हा पहिल्यांदा माझी ऑडिशन मंदार दादाने घेतली होती. तो खूप चांगला दिग्दर्शक आहे, दिग्दर्शक म्हणून त्याच्यासोबत पुन्हा काम नक्कीच करेन पण जर निर्माता म्हणून असेल तर मी त्याच्याकडे काम नाही करणार असे मृणाल या मुलाखतीत स्पष्ट करते.