काही दिवसांपूर्वी मृणाल दुसानिस हिने तिच्या सोशल अकाउंटवरून लवकरच आई होणार असल्याचे जाहीर केले होते. मृणाल आणि नीरज मोरे यांना २४ मार्च २०२२ रोजी कन्यारत्न प्राप्ती झाली. Daddy’s little girl and mumma’s whole world..!!! Our little princess has arrived…!!! असे म्हणत मृणालने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर सांगितली होती. ‘नूरवी’ असं आपल्या गोड लेकीचं नाव देखील तिने त्यावेळी जाहीर केलेलं पाहायला मिळालं. नूरवीच्या येण्यानं मृणालचं घर आता आनंदानं फुलून गेलं आहे. तिच्या अस्तित्वानं आता मृणालचं घर बोलुही लागलं आहे.

याबाबत नुकताच मृणालने एक खुलासा केला आहे. मृणालला सतत बडबड करायला गप्पा मारायला खूप आवडते. याचमुळे सेटवर तिचे सहकलाकारांसोबत छान बॉंडिंग जुळून आलेले पाहायला मिळते. मृणालचा नवरा नीरज त्यामानाने खूप कमी आणि मोजकेच बोलणारा त्यामुळे तिच्या घरात सतत बडबड करणारं कोणी असेल तर ती म्हणजे एकमेव मृणालच होय. मृणाल उत्तम अभिनेत्री तर आहेच शिवाय ती उत्तम गाते देखील हे बहुतेकांना माहीत नसावे. स्वतःच्या लग्नात मृणालने गाणं सादर केलं होतं. तिचं गाणं ऐकून उपस्थितांनी टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली त्यावेळी नीरज स्तब्ध उभा असलेला पाहून त्याच्या मित्राने त्याला टाळ्या वाजवून मृणालला प्रोत्साहन देण्यास सुचवले. त्यामुळे निरजचा लाजराबुजरा स्वभाव मृणालला देखील कळून चुकला होता. आता मुलीच्या आगमनानंतर मात्र नीरज आता नूरवीसोबत दिलखुलास गप्पा मारताना दिसत आहे हे पाहून मृणालला बाप लेकीचा हा गोड क्षण कॅमेऱ्यात टिपावासा वाटला आहे.

अवघ्या १६ ते १७ दिवसाच्या नूरवीसोबत गप्पा मारताना नीरज तितकाच दिलखुलास गप्पा मारण्यात मग्न असल्याचे पाहून मृणाल मात्र पुरती भारावून गेलेली पाहायला मिळत आहे. या भारावलेल्या क्षणी तिने एक पोस्ट लिहिली आहे त्यात ती निरजचे कौतुक करताना दिसत आहे. ‘ आणि शेवटी नीरज बोलता झाला…नाहीतर घरात मी नाही बोलले तर कुणीच बोलत नाही…भयंकर शांतता…पण आता सगळं बदलतंय!’ अशी एक छानशी पोस्ट मृणालने लिहिली आहे. तिच्या ह्या पोस्टवर अनेक कलाकार आणि चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केलेला पाहायला मिळत आहे. बऱ्याच दिवसांपासून मृणाल सोशिअल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असलेली देखील पाहायला मिळत आहे. तिच्या जीवनातील हे सुंदर क्षण ती मनमुरादपणे उपाभिगताना पाहायला मिळत आहे.