कलासृष्टीत स्वतःच्या बळावर अस्तित्व निर्माण करून यश मिळवणं हे साधं सोपं काम नाही. कारण हे क्षेत्रच मुळात बेभरवशाचं आहे. यशाचा हा मार्ग अभिनेत्री मोनालीसा बागल हिला चांगलाच गवसला आहे. नुकतेच मोनालीसा बागल हिने स्वतःच्या बळावर स्वतःचं घर घेतलं आहे. २०२१ मध्ये एक धाडसी पाऊल उचललं आणि ते म्हणजे मी माझं स्वतःचं घर घेतलं.. हे वर्ष संपत असताना मी जर मागे वळून पाहिलं तर माझं घर घेण्याचं स्वप्न सत्यात उतरलेला क्षण अगदी स्पष्ट दिसत…

अर्थात या सगळ्यात माझ्या आई बाबांचा आशीर्वाद आणि खंबीर पाठिंबा देणारी माझी दीदी अश्विनी बागल हिचा मोलाचा वाटा आहे. आज घराची पूजा असे सांगून मोनालीसने एक व्हिडिओ शेअर केला आहे. अभिनेत्री मोनालीसा बागल हिने झाला बोभाटा, प्रेम संकट, ड्राय डे, गस्त यासारख्या चित्रपटातून महत्वाची भूमिका साकारली आहे. काही व्हिडीओ सॉंग, चला हवा येऊ द्या, टोटल हुबलक सारख्या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.रावरंभा या आगामी चित्रपटातून लवकरच मोनालीसा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मोनालीसाची बहीण अश्विनी बागल ही देखील अभिनेत्री आहे. लंडनचा राजा, उसासून आलंय मन या गाण्यातून ती झळकली आहे. टोटल हुबलक हा मालिकेत अश्विनीने छोटीशी भूमिका केली होती. तर याच मालिकेच्या कार्यकारी निर्मितीच्या भूमिकेत देखील ती दिसली होती. यशाची एक एक पायरी चढत या दोघी बहिणी कला सृष्टीत स्वतःची ओळख निर्माण करताना दिसत आहेत. काही वर्षांपूर्वी मोनालीसा आणि अश्विनीच्या आईचे निधन झाले होते. आपले हे यश पाहण्यासाठी आई असायला हवी होती अशी आठवण या दोघी बहिणी नेहमी काढताना दिसतात.

२५ नोव्हेंबर रोजी आईच्या वाढदिवशी तिच्यासोबतच्या आठवणी सांगत मोनालीसने एक भावुक पोस्ट लिहिली होती. Let the adventure begin म्हणत मी २021 मध्ये एक धाडसी पाऊल उचललं आणि ते म्हणजे मी माझं स्वतः चं घर घेतलं… My very own home sweet home… हे वर्ष संपत असताना मी जर मागे वळून पाहिलं तर “माझं घर घेण्याचं स्वप्न आणि ते स्वप्न सत्यात उतरलेला क्षण” अगदी स्पष्ट दिसतं…अर्थात या सगळ्यात माझ्या आई बाबांचा आशिर्वाद आणि माझी StrongPillar दिदी ashwinibagal हीचा मोलाचा वाटा आहे! आमच्या घराची पूजा.. असे म्हणत तिने आपल्या आईला शुभेच्छा दिल्या होत्या. अभिनेत्री मोनालिसा बगल आणि अभिनेत्री अश्विनी बगल ह्या बहिणींना आयुष्याच्या ह्या सुंदर क्षणासाठी खूप खूप शुभेच्छा…