Breaking News
Home / जरा हटके / मीरा आणि तृप्ती देसाई दोघीनी घातला राडा महिलांसाठी लढणारी तृप्री देसाई आता महिलांशीच भांडताना पाहायला मिळणार

मीरा आणि तृप्ती देसाई दोघीनी घातला राडा महिलांसाठी लढणारी तृप्री देसाई आता महिलांशीच भांडताना पाहायला मिळणार

बिग बॉस सीजन ३ सुरु होऊन आता ३ रा आठवडा उजाडतोय पण पहिल्या दिवसापासूनच ह्या शो ने टॉप गियर टाकलेला पाहायला मिळतोय. बिगबॉस मराठी टीआरपी मिळवण्यात चांगलाच यशस्वी ठरला आहे. त्याच कारण देखील अगदी तसच आहे. प्रथमच अश्या शो मध्ये कीर्तनकार महिलेने भाग घेतला त्याचा अनेक स्तरांवरून विरोध देखील झाला. आजारी असल्याचा बहाणा करून कीर्तनकार शिवलीला पाटील हिने ह्यातून काढता पाया घेतला असला तरी अजून महिलांसाठी लढणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई चांगल्याच चर्चेत आहे. आज शो मध्ये एक खेळ खेळताना तृप्ती देसाई आणि अभिनेत्री मीरा जगन्नाथमध्ये कडाक्याचं भांडण पाहायला मिळणार आहे.

trupti and mira jagannath
trupti and mira jagannath

विशेष म्हणजे बिगबॉस च्या घरात मीरा आणि तृप्ती एकात गटात आहेत त्यामुळेच त्यांच्यात हा वाद झाला. मीरा आपली बाजू मांडताना बोलते ” पलटी हा शब्द तृप्ती तुमच्यासाठी नव्हता… ” त्यावर तृप्ती म्हणतात “एक मिनिट आजण कधीही चढवला नाहीये मी, किती शब्द फिरवणार, हि स्वतःला बिगबॉस समजते. हिला असं वाटतंय कि इथे १४ जण खेळायला आले नाहीत तर हि एकटीच खेळ खेळणार आहे.” ह्यावर पुन्हा मीरा म्हणते म्हणे बायकांसाठी लढतेय .. इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकते हि बाई” पण ह्या झालेल्या सर्व राड्याच कारण आजच्या शो मध्ये पाहायला मिळणार आहे. मीरा जगन्नाथ आणि तृप्ती देसाई ह्यांच्यात पहिल्यांदीच अशी बाचाबाची पाहायला मिळतेय. एकाच गटातील दोन महिला ह्यापूर्वी आमने सामने येऊन भांडताना पाहायला मिळाल्या नाहीत. त्यामुळे बिगबॉसच्या घरात आज कश्यावरुन इतकं मोठं भांडण झालं ह्याची उत्सुकता बिगबॉसच्या चाहत्यांना लागून आहे. आज रात्रीच्या भागात ह्या सर्व गोष्टीचा उलगडा नक्कीच पाहायला मिळेल.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *