
गेल्या काही दिवसांपूर्वी गौतमी पाटील हिच्या अश्लील नृत्याविरोधात प्रसिद्ध लावणी कलाकार मेघा घाडगे यांनी आक्षेप घेतला होता. लावणीच्या नावाखाली असे कृत्य केल्यास खपवून घेतले जाणार नाही असे म्हणत गौतमीचा त्यांनी खरपूस समाचार घेतला होता. त्याप्रकरणी गौतमीला जाहीरपणे माफी सुद्धा मागायला लावली होती. यानंतर गौतमीने सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीरपणे माफी मागितली होती. माझ्याकडून चूक झाली , पुन्हा अशी चूक होणार नाही असे तिने म्हटले होते. यानंतर गौतमी पाटील हे नाव चांगलेच ट्रेंडमध्ये येऊ लागले. गौतमीने आपली चूक सुधारली हे देखील अनेकांच्या लक्षात आले. दरम्यान गौतमी आता तिच्या नृत्याच्या अदाकारीवर तरुणाईमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. लवकरच ती घुंगरू या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही प्रसिद्धी मिळवत असताना गौतमीला टीकाकारांना देखील तोंड द्यावे लागत आहे.

नुकतेच मेघा घाडगे यांच्या नावाने एक वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘थोतांड तुमच्या ट्रेंडचे इथे दावू नका, देखाव्याची इंग्रजी इथे आजमावू नका, ढोलकी आणि लेझीमला कुणी तोड नाही, ज्याला माहीत नाही लावणी त्याला मराठी म्हणून नका…’ अशा आशयाचे त्यांचे हे वक्तव्य गौतमी पाटीलला उद्देशून असल्याचे मीडिया माध्यमातून पसरले आहे. मात्र मी हे वक्तव्य केलेलेच नाही असा संताप मेघा घाडगे यांनी व्यक्त केला आहे. मीडियाच्या या बातमीने मेघा घाडगे त्यांच्यावर चांगल्याच संतापल्या आहेत. “का करताय तुम्ही हे सगळं ?? हे मी म्हटलेल वाक्य नाही मराठी stutus क्विट्ड वरन घेतलंय . काय संबंध आहे का माझा त्या मुलीशी हे जोडायला . का पत्रकार करताय तुम्ही अस ?? अहो या आशा trolling मुळे जीव जाईल माझा . किती घाण बोलाल अजुन “. असा खरपूस समाचारच त्यांनी या माध्यमांचा घेतला आहे. सोबतच त्यांनी असेही म्हटले आहे की, “सामान्य घरात वाढलेली मुलगी आहे मी . खुप पारकोटीची मेहनत आहे माझी . मीच नाही असे अनेक कलाकार मेहनतीनेच मोठे झालेत . इतक्या घाण शब्दात बोलताय आहो थोडा तरी विचार करा . का त्या मुलीशी माझ नाव जोडताय . मिडिया वाल्यांना हात जोडुन पाया पडून विनंती आहे माझी . नका करू अस.

नाही सहन करू शकणार अजुन मी . माझ्या ही घरी आई , भावंड माझे संपुर्ण कुटूंब आहे . जे माझ्यावर अवलंबून आहेत . माझ्या मुली आहेत जे ते ही हे बघतात . त्यांच्या मनावर पण परिणाम होतो त्याचा . तुमच ही कुटूंब असेल तुम्हाला अस बोललेलं सहन होईल का ?? नका ना त्रास देऊ”. मेघा घाडगे यांच्या या स्पष्टीकरणानंतर नेटकऱ्यांनी देखील त्यांना सहकार्य दाखवले आहे. ह्या वक्तव्याचा आणि गौतमी पाटीलचा कुठलाच संबंध नाही त्या मुलीशी माझं मत जोडू नका अशी विनंती तिने सोशल मीडियावर केलेली आहे. आयुष्यभर मेहनत करून आज चित्रपटात आपलं नाव कमावलेल्या अभिनेत्रीला सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने ट्रोल केलं जातंय ह्याचा अनेकांना राग देखील आलेला पाहायला मिळतोय. हे सगळं थांबवण्याचे आवाहन अभिनेत्री मेघा घाडगे करताना पाहायला मिळत आहे.