Breaking News
Home / जरा हटके / अभिनेत्री लीना भागवत यांनी वयाच्या ४८व्या वर्षी घेतलं घर म्हणाल्या नवी सुरूवात झाली

अभिनेत्री लीना भागवत यांनी वयाच्या ४८व्या वर्षी घेतलं घर म्हणाल्या नवी सुरूवात झाली

आजकाल सेलिब्रिटी कलाकार त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांशी शेअर करत असतात. सोशल मीडियामुळे हा संवाद अधिक सोपा झालाय. कलाकार सुटीसाठी कुठे जातात, नवीन खरेदी काय करतात इतकंच नव्हे तर अगदी प्रेगन्सीपासून ते डोहाळंजेवण आणि लग्नाचे सोहळेही चाहत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कलाकारांचा उत्साह असतो. त्यामुळे आपल्या आवडत्या कलाकारांच्या आयुष्यात येणाऱ्या आनंदाच्या क्षणांचे साक्षीदार त्यांचे चाहतेही होत असतात. आता अशीच एक पोस्ट अभिनेत्री लीना भागवत आणि अभिनेता- दिग्दर्शक मंगेश कदम यांनी शेअर केली आहे. लीनाने वयाच्या ४८ व्या वर्षी गुडन्यूज देत नवी सुरूवात झाली असं म्हणत गोड बातमी देली आहे.

leena bhagwat marathi actress
leena bhagwat marathi actress

या बातमीने त्यांच्यावर चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ही गोडी बातमी म्हणजे त्यांच्या घरी काही नवा पाहुणा येणार नाही तर त्यांनी नुकतच नवं घर खरेदी केलं आहे. गेली अनेक वर्ष नाटक आणि मालिका या क्षेत्रात लीना आणि मंगेश कदम ही जोडी काम करतेय. सध्या ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत लीना सुवर्णा म्हणजेच सुवाआईच्या भूमिकेत आहे तर मंगेश कदम हे विठोबा म्हणजेच विठूबाबा ही भूमिका साकारत आहेत. या मालिकेच्या निमित्ताने लीना आणि मंगेश ही जोडी घराघरात पोहोचली आहे. प्रत्यक्ष आयुष्यातही हे दोघं नवरा बायको आहेत त्याप्रमाणे अनेक नाटक आणि मालिकांमध्येही त्यांनी पतीपत्नीची भूमिका साकारली आहे. एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेच्या सेटवरच त्यांची पहिली भेट झाली. त्यांना एकमेकांविषयी प्रेम वाटू लागलं. विशेष म्हणजे मालिकेच्या शूटिंगमधून एक दिवसाची सुट्टी घेत या दोघांनी लग्नं केलं होतं. गेल्या अनेक वर्षापासून लीना आणि मंगेश यांनी स्वत:चं घर खरेदी करण्याचं स्वप्नं पाहिलं होतं. हे स्वप्नं पूर्ण करण्यासाठी दोघांनीही खूप मेहनत केली. अखेर लग्नानंतर आठ वर्षात त्यांचं घरकुल उभं राहिलं. नुकताच लीना आणि मंगेश यांनी गृहप्रवेश केला. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ या दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये मुख्य प्रवेशद्यवारातून मंगेश आणि लीना घरात पहिलं पाऊल टाकण्याचा आनंद लुटत आहेत.

leena bhagwat husband mangesh
leena bhagwat husband mangesh

तसेच लीनाने घराच्या दरवाजावर कुंकूतिलक लावला. कलश पूजन केलं आणि त्यांच्या या घरात प्रवेश केला. लीना आणि मंगेश सध्या वयाच्या पन्नाशीच्या उंबरठ्यावर आहेत. वयाच्या या टप्प्यावर स्वत:चं घर घेण्याचा आनंद खूप वेगळा आहे अशी प्रतिक्रिया दोघांनी दिली आहे. लीना आणि मंगेश यांनी एकत्र अनेक नाटकं केलं आहेत. गेली तीस वर्ष ही जोडी अभिनयक्षेत्रात काम करत आहे. १९९६ साली अधांतर हे या जोडीचं पहिलं नाटक. लीना ही अभिनेत्री तर मंगेश हे लेखक आणि दिग्दर्शक आहेत. अनेक नाटक आणि मालिकांमध्येही त्यांनी पतीपत्नीच्या व्यक्तीरेखा रेखाटल्या आहेत. होणार सून मी या घरची या मालिकेतील लीना भागवत यांची भूमिका खूप गाजली, तर गोष्ट तशी गंमतीची या नाटकात लीना आणि मंगेश यांच्यासोबत अभिनेता शशांक केतकरही होता.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published.