“प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो” असं तुम्ही अनेकदा ऐकलही असेल आणि वाचलंही असेल. अशाच सिनेसृषटीतील अनेक जोडपी छोट्या मोठ्या कारणांवरून घटस्फोट घेतात. मात्र संयम आणि समजुतीने मोठ मोठ्या अडचणी देखील क्षणात नाहीश्या होतात याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे अभिनेत्री क्रांती रेडकर आणि तिचे पती समीर वानखेडे. गेल्या सहा ते सात महिन्यांत दोघांवरच काय तर संपूर्ण कुटुंबावर रोज नवनवीन भाष्य करणारे मजकूर आणि पोस्ट पाहायला मिळत होत्या. त्यांच्या आयुष्यात एक वेगळंच वादळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात होता.

क्रांती रेडकर ही कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. दिवसभरात ती सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि फोटो शेअर करते. यामध्ये कधी जेवणाच्या साध्या टीप्स, मजेशीर चुटकुले आणि दैनंदिन जीवनातील अनके गोष्टी सांगत ती चाहत्यांच मनोरंजन करते. आणि आनंदी राहते. क्रांतीने नुकताच तिच्या पतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये समीर एका फुग्यशी खेळताना दिसत आहेत आणि नंतर लगेचच ते काम करताना देखील दिसत आहेत. या दोन्ही गोष्टी ते किती सहज रित्या पार पाडतात हेच या व्हिडीओमधून समजते. या व्हिडिओमध्ये मागे इडी शेरेनच एक गाणं वाजत आहे. तसेच या गाण्याबरोबर क्रांती तिच्या पतीचे कौतुक करत म्हणत आहे की, “मी नशीबवान आहे की तुम्ही माझ्या आयुष्यात आहात.” क्रांतीने शेअर केलेल्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. यात एका चाहत्याने कमेंट करत लिहिले आहे की, “तुम्ही तर खरे हिरो आहेत.”

क्रांती आणि एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे या दोघांसाठी काही महिन्यंपूर्वीचा काळ फार कठीण आणि खडतर होता. बॉलिवूडचा किंग खान असलेल्या शाहरुख खानचा पुत्र आर्यन खान याला समीर यांनी एका रेव्ह पार्टीत ताब्यात घेतले होते. या नंतर नवाब मलिक यांनी त्यांच्या विवाहित आयुष्यावर चांगलेच ताशेरे ओढले. या सर्व प्रकारात अभिनेत्री क्रांती मात्र जराही डगमगली नाही. तिने न्याय मिळेपर्यंत आपल्या पतीला पूर्ण साथ दिली आणि आता हे दोघेही आपल्या सुखी संसारात मग्न आहेत. क्रांतीने आता पर्यंत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. ज्यामध्ये जत्रा, माझा नवरा तुझी बायको, लाडी गोडी, पिपाणी, खो खो अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. यासह क्रांतीने एका चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले आहे. काकण हा तिचा पहिला मराठी दिगदर्शित चित्रपट होता.