
शाहरुख खान याचा मुलगा आर्यनला काही दिवसांपूर्वी अटक झाली आणि त्याची केस अभिनेत्री क्रांती रेडकर हीच पती अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडे गेली. आणि तेंव्हापासून समीर वानखेडेंना टार्गेट केलेलं पाहायला मिळतंय. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आता समीर वानखेडे आणि त्यांच्या घरातील सदस्यांवरच टीका करायला सुरवात केली आहे. एका पत्रकार परिषदेत त्यांनी चक्क सरकारी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर विधान करत म्हणाले” समीर वानखेडेचा बाप बोगस आहे, त्याच्या घरातील सगळेच बोगस आहेत वर्षभरात त्याची नोकरी जाईल आणि तो तुरुंगात जाईल.” ह्यावर अधिकारी समीर वानखेडे यांनी देखील आपलं मत मांडलं होत. अधिकारी समीर वानखेडे म्हणाले…

सरकारी अधिकारी नवाब मालिकांच्या विधानावर म्हणाले “नवाब मलिक हे खोटारडे आहेत मला बाजूला करण्यासाठी हे सर्वकाही केलं जातंय आणि मी त्याच्यावर नक्कीच कायदेशीर कारवाई करणार”असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पण आता नवाब मालिकांना नवी खेळी करत समीर वानखेडे यांच्या पहिल्या लहानातील फोटो शेअर करत ह्यात आणखीन गुंतागुंत वाढवली आहे. याच सोबत त्यांनी काही कागदपत्रे देखील शेअर केली होती. ह्यावर देखील समीर वानखेडे यांनी स्पष्टीकरण देत म्हणाले “मी सांगू इच्छितो कि माझे वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे ३० जून २००७ रोजी उत्पादन शुल्क पुणे येथील विभागात पोलीस निरीक्षक म्हणून निवृत्त झाले होते. माझे वडील हिंदू आणि आई मुस्लिम आहे. माझ्या आईच नाव स्वर्गीय श्रीमती झहीदा ह्या मुस्लिम होत्या. मी भारतातील संमिश्र बहुधर्मीय आणि धर्मनिरपेक्ष कुटुंबात जन्माला आलो आणि मला त्याचा अभिमान आहे. आता नुकतंच अभिनेत्री क्रांती रेडकर हिने देखील आपलं मत सोशिअल मीडियावर मांडलं आहे ट्विट करत त्या म्हणाल्या…

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी शेअर केल्या त्या फोटोंवर अभिनेत्री क्रांती रेडकर हिने आपलं मत मांडलं आहे तीने ट्विट करत सांगितलं कि ” मी आणि माझे पती समीर वानखेडे आम्ही दोघेही हिंदू आहोत. आम्ही कधीही कोणत्याही धर्मात धर्मांतर केलं नाही. आमच्यासाठी सर्व धर्म सामान आहेत. माझे पती समीर वानखेडे यांचे वडील हिंदू असून त्यांनी मुस्लिम महिलेशी लग्न केलं. आज माझ्या सासूबाई ह्या जगात नाहीत. माझे पती समीर वानखेडे यांचं पाहिलं लग्न हे विशेष विवाह कायद्या अंतर्गत झालं होत. माझ्या पतीने २०१६ साली कायद्याने घटस्फोट घेतला आहे आणि आम्ही हिंदू कायद्या नुसारच लग्न केलं आहे.” मुद्दा बाजूला ठेऊन हे वेगळंच राजकारण चालेल पाहायला मिळतंय असं अनेकांचं मत आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी खोटे पुरावे दिले आणि खोटे आरोप करत असल्याचं ह्यावेळी अधिकारी अमीर वानखेडे आणि पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर वानखेडे दोघांनीही स्पष्ट्पणे म्हटलं आहे.