जत्रा, गंगाजल, माझा नवरा तुझी बायको, फुल 3 धमाल, लाडी गोडी अशा हिंदी मराठी चित्रपटातून महत्वाच्या भूमिका साकारून अभिनेत्री क्रांती रेडकर हिने आपल्या सजग अभिनयाची झलक दाखवून दिली. जत्रा चित्रपटातील ‘कोंबडी पळाली…’ गाण्यामुळे क्रांती रेडकरला अमाप प्रसिद्धी मिळाली होती या गाण्याशी मिळते जुळते असलेले चिकणी चमेली… हे हिंदी चित्रपट गीत देखील तुफान लोकप्रिय झाले होते. २००० सालच्या सून असावी अशी या चित्रपटातून क्रांतीने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते.

भरत जाधव असो वा अंकुश चौधरी यांच्यासोबत तिची जुळलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना देखील आवडली होती. रामनारायण रुईया कॉलेजमध्ये असताना अभिनयाची आवड तिच्यात निर्माण झाली होती . मार्च २०१७ साली समीर वानखेडे यांच्याशी ती विवाहबद्ध झाली होती. याची वाच्यता कुठेच न झाल्याने मीडिया देखील तिच्या लग्नाबाबत अनभिज्ञ होती. डिसेंबर २०१८ मध्ये तिने जुळ्या मुलींना जन्म दिला. मधल्या काळात ‘ziyazyda’ या कपड्यांच्या ब्रँडची स्थापना केली. क्रांती रेडकरने नेमके कोणासोबत लग्न केले याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. सुशांतच्या केसमुळे समीर वानखेडे क्रांतीचे पती आहेत हे सोशल मीडियावर जास्त प्रमाणात व्हायरल झालं. समीर वानखेडे हे २००४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबई एअरपोर्टवर कस्टम अधिकारी म्हणून त्यांची पहिली पोस्टिंग झाली होती. क्रांती नेहमी तिच्या इंस्टाग्रामवरून व्हिडीओ शेअर करत असते मात्र सुशांतच्या केस नंतर पहिल्यांदाच तिने आपल्या पतीसोबत एक व्हिडिओ शेअर केला होता त्याला चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छा मिळाल्या होत्या.

क्रांतीला पती समीरबद्दल नेहमीच आदर वाटतो तसे तिने अनेकदा त्यांचे कौतुकही केले आहे ‘माझ्या विश्वाचं केंद्रस्थान असलेल्या या खास व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! या व्यक्तीवर मी सर्वात जास्त प्रेम करते, त्याचा आदर करते. तुझ्याबद्दल मला नेमकं काय वाटतं? हे सांगण्यासाठी शब्द कमी पडतात. तू माझ्या आयुष्यात आला त्याबद्दल मी देवाचे आभार मानते. नेहमी आनंदी राहा. तुझं जगण्याचं कारण, जिद्द आणि तुझी मुल्ये ही तुझी खरी ताकद आहे, त्यासाठी तुला सलाम’…. दोन दिवसांपूर्वी तिने आपले सासरे देखील पोलीस असल्याचे सांगून राष्ट्रभक्तीचा अंगभूत असलेला गुण समिरमध्येही रुजला गेला असल्याचे म्हटले आहे. सिनिअर वानखेडे आणि ज्युनिअर वानखेडे देश हितासाठी झटत आहेत हे पाहून अनेकांनी क्रांतीचे वानखेडे कुटुंबाचे कौतुक केल्ड आहे. आम्हाला तुमच्या कुटुंबाचा अभिमान वाटतो अशा शब्दात चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.