‘दिवाळी फराळ’ परदेशात विकून कोट्याधीश झालेल्या ह्या मराठी माणसाची पत्नी आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री

सचिन गोडबोले यांच्या आई सौ सुमती दिनकर गोडबोले ह्या पाककृतीत विशेष पारंगत त्यामुळे ह्याचा उपयोग करून त्यांनी व्यवसाय करायचा ठरवले. सुरुवातीला ५ पदार्थ विकून सुरू केलेला हा व्यवसाय आता वृद्धिंगत होऊन कोट्यवधींची उलाढाल करताना दिसत आहे. त्यांचा मुलगा सचिन गोडबोले हा एमकॉम असून जपानमधील essaye- terooka कंपनीत उच्च पदावर नोकरी करत होता. वडिलांच्या निधनानंतर आणि आईच्या शब्दाखातर नोकरी सोडून दुकानाकडे लक्ष देण्याचे ठरवले. अद्ययावत सुविधा असलेलं दादर मुंबई येथे मराठी माणसाचं घरगुती पदार्थांचं दुकान त्याने थाटल.

त्यांच्या दिवाळी फराळाला तर चक्क परदेशातून मोठ्या प्रमाणात मागणी असते अगदी जेव्हा लग्न होऊन माधुरी दीक्षित परदेशात स्थायिक झाली होती त्यावेळी तिच्या घरी गोडबोलेंचाच फराळ पोहोच केला जायचा. यातून परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना घरचाच फराळ मिळाल्याचे समाधान वाटायचे. हळूहळू व्यवसाय वाढू लागला आणि पाहता पाहता कोट्यवधींच्या घरात गेला. कोणतेही काम छोटे नसते फक्त आपण ते कश्याप्रकारे लोकांसमोर मांडून आपला व्यवसाय चालवतो ह्याला जास्त महत्व असत हेच सचिन गोडबोले यांनी करून दाखवलं. खरंच मराठी माणसाने त्यांच्याकडून आदर्श घ्यायला हवा. यश आणि अपयश ह्या नंतरच्या गोष्टी आहेत पण त्यासाठी जिद्दीने काहीतरी करून दाखवायची उमेद असेल तर सर्व काही शक्य आहे. पुढे त्यांनी दिवाळी फराळासोबत ड्राय फ्रुट आणि पॅकेटिंग काड्या पदार्थाना देखील समावेश केला. हळूहळू व्यवसाय वाढत गेला. जे लोक ह्यांच्याकडून ऑर्डर घेत ते समाधानी असल्याने तेच त्यांच्या पब्लिसिटीचे माध्यम ठरले आणि व्यवसाय वाढत गेला.

सचिन गोडबोले यांची पत्नी “किशोरी गोडबोले” ही मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मराठीतील नामवंत गायक जयवंत कुलकर्णी यांच्या त्या कन्या आहेत. मिसेस तेंडुलकर, माधुरी मिडलक्लास, अधुरी एक कहाणी, हद कर दि, एक दो तीन, खिडकी, मेरे साई यासारख्या हिंदी मराठी मालिका तिने आपल्या अभिनयाने गाजवल्या आहेत. या सोबत काही नावाजलेले मराठी चित्रपट जसे फुल ३ धमाल, खबरदार, कोहराम, वन रूम किचन हे चित्रपट तिने गाजवले आहेत. सचिन आणि कोशोरी गोडबोले यांना सई आणि गौरी या दोन मुली आहेत. किशोरी गोडबोले सध्या मराठी सृष्टीत कमी दिसत असल्या तरी हिंदी मालिकेत त्यांनी आपला चांगलाच जम बसवला आहे. किशोरी गोडबोले यांची सक्खी बहीण देखील गायिका आहे तर वडील प्रसिद्ध गायक जयवंत कुलकर्णी. आजही जाहिराती आणि हिंदी मालिकांत किशोरी गोडबोले ह्या पाहायला मिळतात. सचिन गोडबोले आणि किशोरी गोडबोले दोघांनाही पुढील वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण टीम कडून खूप खूप शुभेच्छा..