काही मराठी सेलिब्रिटी हे नेहमीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर असलेले पाहायला मिळाले आहेत. अनेक वादग्रस्त वक्तव्या मुळे केतकी चितळे ही नेहमीच काही ना काही तरी पोस्ट करून वादावर घडवून आणते. गेल्या काही दिवसांपूर्वी तिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख करणारी पोस्ट लिहिली होती त्यावरून तिला अनेलानी ट्रोल केलेले पाहायला मिळाले. मालिकेतून तडकाफडकी काढणे असो वा ट्रोलर्सकडून होणारा वाद अशामुळे केतकी चितळे नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. आता तर केतकी चितळेने चक्क शरद पवार यांचे नाव न घेता आणखी एक वाद पेटवून दिलेला पाहायला मिळतो आहे. तुका म्हणे पवारा नको उडवू तोंडाचा फवारा…असे म्हणत तिने चक्क एक कविताच शेअर केली आहे.

तिने शेअर केलेली ही आगळी वेगळी कविता वाचून मात्र शरद पवार यांच्या समर्थकांनी केतकी चितळेला आता धारेवरच धरलेले पाहायला मिळत आहे. केतकीने ही कविता लिहिली नसली तरी ही कविता तिने शेअर केल्यामुळे सध्या सोशल मीडियावर ती एक चर्चेचा विषय ठरली आहे. यावरून अनेकांनी तिला ट्रोल केलेलं पाहायला मिळत आहे. केतकीने शेअर केलेल्या कवितेत म्हटले आहे की, ‘तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll’ ऍडव्होकेट नितीन भावे यांनी ही कविता लिहिली असून केतकीने तिच्या सोशल अकाऊंट शेअर केली आहे. अवघ्या काही तासातच तिच्या या शेअर केलेल्या कवितेवर ट्रोलर्सच्या उड्या पडल्या आहेत.
