
बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेत्यांनी अभिनेत्रीशी लग्न केलेलं पाहायला मिळालय. नुकतीच अभिनेत्री कतरीना कैफ आणि विकी कौशल या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याच्या अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. येत्या डिसेंबर महिन्यात ते दोघे अमुक तमुक ठिकाणी लग्न करणार अश्या चर्चा सुरु झाल्या सोशिअल मीडियावर ह्या बातम्या वाऱ्याच्या वेगाने पसरताना देखील पाहायला मिळाल्या. ह्या दोघांनीही ह्याबाबत आजवर कधीही खुलासा केला नाही. जेंव्हा कतरिनाला तू आणि विकी कौशल तुम्ही कधी लग्न करणार असा प्रश्न विचारला त्यावर कतरीना कैफ काय म्हणाली पहा…

विकी कौशल बद्दलच्या त्या चर्चेवर बोलताना कतरीना म्हणाली ” जेव्हापासून मी बॉलिवूडमध्ये माझा जम बसवला तेंव्हापासून मीडिया मला एकाच प्रश्न विचारात आहे तो म्हणजे मी लग्न कधी करणार? गेली १५ वर्ष तुम्ही मला हेच विचारात आहेत. विकी कौशल आणि मी आम्ही दोघे राजस्थानमध्ये लग्न करणार आहोत ह्या सर्व अफवा आहेत. आम्ही दोघे फक्त मित्र आहोत. अश्या अफवा का पसरवल्या जातात कुणास ठाऊक. मी अजूनही कोणाशीच लग्नाचा विचार केलेला नाही लग्नाच्या विचारापासून मी खूप लांब आहे. कृपया अफवा पसरवू नका.” विकी कौशल आणि कतरीनाने लग्नासाठी प्रसिद्ध ड्रेस डिझायनर सब्यासाची निवड केली आणि हे दोघेजण राजस्थानमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याचीही बातमी हि साफ चुकीची असल्याचं उघड झालं आहे. कैतरीनाचं आजवर अनेक प्रसिद्ध व्यक्तींसोबत नाव जोडलं गेलं होत. अभिनेतेच नाही तर बिजनेसमन विजय मल्ल्या याच्या मुलाशी देखील तिचं नाव जोडण्यात आलं होत. सलमान खान याने कतरिनासोबत अनेक चित्रपट केले. फक्त चित्रपटच नाही तर ती अनेकदा सलमानच्या घरी देखील गेल्याचे अनेक फोटो सोशिअल मीडियावर रेंगाळत आहेत.

अनेकदा सलमान खान याला देखील लग्नाबाबत विचारणा केली जाते. तुला कोणती अभिनेत्री सर्वात जास्त आवडते असं विचारल्यावर तो हसून कतरिनाचंच नाव घेताना पाहायला मिळतो. पण इकडे कतरिनाने ह्या दोघांच्या नात्याबाबत कधीही कोणताही खुलासा देखील केलेला नाही. विकी कौशल सोबत नाव जोडण्याआधी तीच रणबीर कपूर सोबत देखील नाव जोडण्यात आलं होत. पण आता रणबीर कपूर आणि आलीय भट्ट हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मीडिया कोणतीही बातमी सांगताना त्याला रंग चढवून सांगते त्यामुळेच अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या मनात तस काहीही नसलं तरी ह्या जोड्या एकमेकांच्या प्रेमात असून लवकरच लग्न देखील करणार असल्याच्या अफवा पसरवल्या जातात. फक्त बॉलिवूड मधेच नाही तर मराठी चित्रपट अभिनेते आणि अभिनेत्रींच्या बाबतीत देखील अश्याच अफवा पस्रवल्यामुळे अनेकदा त्यांना समोर येऊन त्याबाबदचा खुलासा करावा लागतो.