Breaking News
Home / जरा हटके / मराठी अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू. पुढच्या महिन्यात होणार होता साखरपुडा

मराठी अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू. पुढच्या महिन्यात होणार होता साखरपुडा

गोव्यातील बार्देश तालुक्यातील हडफडे येथील खाडीत भीषण अपघातात मराठी अभिनेत्रीचे निधन झाले आहे. ही घटना सोमवारी पहाटे ५ वाजता घडली होती. कारमध्ये अभिनेत्री ईश्वरी देशपांडे आणि तिचा मित्र शुभम देडगे यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी एका क्रेनच्या साहाय्याने त्यांची गाडी खाडीतील पाण्यातून बाहेर काढली होती. ईश्वरी देशपांडे ( वय वर्षे२५) ही अभिनेत्री आहे. मनाची दशा, प्रेमाचे साईड इफेक्टस या गाण्यातून ईश्वरी देशपांडे झळकली होती. आभिनयासोबतच ती मॉडेलिंग क्षेत्रातही सक्रिय होती.

actress ishwari deshpande
actress ishwari deshpande

काही चित्रपट देखील तिने अभिनित केले असून तिचे हे चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर होते. पुण्यातील सुस परिसरात ती राहायला होती. इथूनच तिने आपले शिक्षण पूर्ण केले होते. तर तिचा मित्र शुभम देडगे ( वय वर्ष २८) हे दोघेही लवकरच लग्न करणार होते. शुभम देगडे हा देखील पुण्यातच वास्तव्यास होता. या दोघांची खूप वर्षांपासून चांगली मैत्री होती आणि पुढच्याच महिन्यात त्या दोघांचा साखरपुडा होणार होता. साखरपुडा झाल्यावर ते दोघे काही दिवसातच लग्नही करणार होते मात्र ह्या सर्व गोष्टी होण्याअगोदरच दोघांचे निधन झाल्याची बातमी समोर येत आहे.ईश्वरी देशपांडे आणि शुभम देगडे आपल्या गाडीने गोव्यातील अंजुना बीचवर पहाटेच्या सुमारास जात होते. भरधाव वेगात असलेली त्यांची गाडी सुरुवातीला खाडीजवळ असलेल्या एका झाडाला आदळली गाडीला वेग असल्याने त्यांची गाडी कोलांटी उडी घेत खाडीत कोसळली. दरम्यान ईश्वरीने मला वाचवा अशा हाका मारल्याचे प्रथमदर्शीनी सांगतात. त्यांची गाडी खाडीत असल्याने घटनास्थळी असलेल्या लोकांना त्या दोघांची लवकर मदत करता आली नाही. अग्निशमन दल पाचारण होताच त्यांच्या गाडीचे लॉक तोडण्यात आले मात्र त्यागोदरच ईश्वरी आणि शुभमचा मृत्यू झाला होता. मृतदेह बाहेर काढल्यावर त्यांची गाडी क्रेनच्या साहाय्याने पाण्याबाहेर काढण्यात आली होती.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *