
झी मराठी वाहिनीवर एक दोन नव्हे तर तब्बल पाच नव्या मालिका दाखल होणार आहेत. एकापाठोपाठ एक येत असलेल्या या मालिकांमुळे सध्या झी मराठी वाहिनीचे प्रेक्षक आश्चर्य व्यक्त करताना दिसत आहेत. टीआरपीमध्ये आघाडीवर असलेली वाहिनी म्हणजेच स्टार प्रवाह वाहिनीला तगडी टक्कर देण्यासाठी आता झी मराठी वाहिनीने कंबर कसलेली पाहायला मिळत आहे. त्यात भर म्हणून की काय श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे सारखे तगडे कलाकार “माझी तुझी रेशीमगाठ” या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. ही झी वाहिनीची जमेची बाब ठरली आहे.

या मालिकेसोबतच “ती परत आलीये”, “मन झालं बाजींद”, “तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं” या मालिकाही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तर लवकरच झी वाहिनी आणखी एक ५ वी नवी मालिका प्रेक्षकांसमोर आणणार आहे. या नव्या मालिकेतून अभिनेत्री “ऋता दुर्गुळे” मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ही मालिका असेल की रियालिटी शो याबाबत लवकरच माहिती समोर येईल मात्र ऋता दुर्गुळे हिच्यासोबत आणखी एक कलाकार या मालिकेत झळकणार आहे. हा अभिनेता नेमका कोण आहे याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. अनेकांनी कमेंट करत हा लागीर झालं जी मधील आज्या म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाण असल्याचं सांगितलं आहे. तर काहींनी हा “होणार सून मी ह्या घरची” मधला जानव्ही चा भाऊ साकारणारा अभिनेता “रोहन गुजर असल्याचं सांगितलं आहे. पण सर्वानाच फुलपाखरू मधील यशोमन आपटे आणि ऋता दुर्गुळे ह्यांची जोडी फारच आवडली होती. त्यामुळे तो ह्या मालिकेत पाहायला आवडेल असं म्हटलं आहे. पण हा नव्या मालिकेतला हिरो कोण हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. या नव्या मालिकेचे नाव जाहीर केले नसले तरी ऋता दुर्गुळेमुळे हि मालिका पाहायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल ह्यात शंका नाही.