चेहऱ्यावरील हावभाव आणि अप्रतिम अभिनयाने हृता दुर्गुळेने आजवर नाटक तसेच मालिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. इन्स्टाग्रामवर सर्वात जास्त फॅनफॉलोअर्स असणारी ती पहिली मराठी अभिनेत्री ठरली आहे. त्याचमुळे हृता महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. फुलपाखरू मालिकेतील तिच्या अभिनयाची वाहवा झाली होती. या मालिकेनंतर हृताला झी मराठी वाहिनीचा मोठा प्लॅटफॉर्म मिळाला. मन उडू उडू झालं या मालिकेत ती दीपिकाची मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसली. हृतामुळे या मालिकेचा फॅनफॉलोअर्स देखील चांगला वाढलेला पाहायला मिळाला. मालिकेत दिपू आणि इंद्राची प्रेमकहाणी तिच्या आईला समजली आहे त्यामुळे या दोघांची ताटातूट झाली आहे मात्र हे दोघेही लवकरच पुन्हा एकत्र येतील अशी आशा आहे. परंतु मालिका आता रंजक वळणावर येऊन ठेपली असतानाच हृताने या मालिकेतून काढता पाय घेतला असल्याचे समोर आले आहे.

नुकतेच मालिकेच्या सेटवर स्वच्छतेच्या कारणावरून हृता दुर्गुळेने आक्षेप घेतला होता .तसेच निर्माता टीमशीदेखील तिचा वाद झाला होता. मन उडू उडू झालं या मालिकेतील इंद्रा आणि दिपू ची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडत आहे .सध्या ही मालिका इंद्रा आणि दिपू यांचे प्रेम यशस्वी होणार का अशा एका रंजक वळणावर आली आहे .आणि त्यातच ऋता ही मालिका सोडणार असल्याची बातमी समोर आल्याने तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. दिपू आणि इंद्राची केमिस्ट्री या मालिकेत प्रत्येकालाच आवडत असल्यामुळे जर ऋताने ही मालिका सोडली तर तिच्या जागी येणारी नवी अभिनेत्री कोण असेल याचीही चर्चा सुरू झाली आहे. या मालिकेचं शूटिंग ज्या ठिकाणी सुरू आहेत त्या सेटवर स्वच्छता नसल्याची तक्रार ऋताने निर्मिती टीमकडे केली होती. मात्र त्यावर प्रॉडक्शन टीमने कोणतीच दखल घेतली नसल्याचं ऋताने पुन्हा एकदा टीमला सांगितलं होतं. या स्वच्छतेच्या कारणावरूनच ऋताने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे .मध्यंतरी ही बातमी म्हणजे अफवा असल्याचे देखील सांगण्यात येत होतं परंतु अद्याप तरी यावर कोणीच जाहिरपणे बोललेलं नाही. मराठी मनोरंजनाची अधिकृत माहिती देणाऱ्या सोशल मीडिया हँडलवर ऋता ही मालिका सोडत असल्याची बातमी देण्यात आली होती.

सेटवर नेहमी असलेल्या अस्वच्छतेमुळे ऋता ला त्रास होत असल्याचं तिनं सांगितलं होतं. याबाबत वारंवार तक्रार करूनही त्याकडे लक्ष न दिल्याने ऋता नाराज होती . यावरूनच ऋता आणि निर्मिती टीमचे वाद झाले आणि त्यातूनच ऋताने या मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचे सध्या सांगण्यात येतय. एकीकडे ऋता या मालिकेतून बाहेर पडत असल्याचा मुद्दा चर्चेत आहे. परंतु त्याहीपेक्षा ऋता या मालिकेतून बाहेर पडली तर इंद्रा आणि दिपू ची केमिस्ट्री पाहता येणार नाही या विचाराने या मालिकेचे चाहते मात्र नाराज झाले आहेत. सुरुवातीपासूनच इंद्रा आणि दिपू या जोडीतला रोमान्स आणि त्यांच्यातले सीन प्रेक्षकांना नेहमीच आवडतात. मध्यंतरी काही काळ या मालिकेत संथपणा आला असल्याच्या कमेंटही प्रेक्षकांनी केल्या होत्या. परंतु आता सध्या दिपू आणि इंद्रा यांचं प्रेम असल्याचं तिच्या आईला समजल्यानंतर या दोघांच्या प्रेमात आलेला अडथळा ते कसे पार करणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिलं आहे. पण वैयक्तिक कारणामुळे ऋता ही मालिका सोडत असल्याची बातमी समोर आल्याने या मालिकेची जोरदार चर्चा सुरू आहे.