महाराष्ट्रातील कोणत्याही तरुण मुलासमोर फक्त फुलपाखरू असं नाव जरी घेतलं तरी पटकन त्याला ऋता दुर्गुळे आठवते. फुलपाखरू या मालिकेतून ऋताला विशेष पसंती मिळाली. ती सोशल मीडियावर सतत तिचे वेगेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. अशात अनेक तरुणांच्या थेट काळजावर बोट ठेवेल असा तिचा एक सुंदर फोटो खूप व्हायरल होत आहे. मंडळी इथे दिसत असलेला हा फोटो एका लग्नातला आहे बरं. पण ऋताच्या नाही, तर तिच्या भावाच्या लग्नातला हा फोटो आहे.

नुकतेच तिच्या भावाचे लग्न पार पडले त्यावेळी तिने ही गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. यावर तिने स्लिव्हलेस ब्लाऊज घातला होता. यामुळे ऋताचं सौंदर्य आणखीनच खुलून आलं. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ” गौरव आणि विधी.. भाई की शादी.” यासह तिने आणखीन एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने मरुन रंगाचा घागरा घातला आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांसह अनेक कलाकार देखील तिला कमेंट करत आहेत. अशात माधुरी देसाईने तिला कमेंटमध्ये लिहिले आहे की, “Damn” आणि सोबत एक हार्ट ईमोजी पाठवला आहे. तसेच रिना मधुकरने तिला, “सो प्रीटी” असं म्हटलं आहे. एका चाहत्याने तर तिला “परम सुंदरी” अशी उपमा दिली आहे. तर एकाने तिला “तुझं लग्न कधी होणार असं विचारलं आहे.” प्रत्येक मराठमोळ्या मुलाची ऋता ही क्रश झालेली आहे. तिच्या सौंदर्याने आणि दिलखेच स्माइलने तिने अनेक तरुणांनच्या मनात स्वतःची एक वेगळी जागा निर्माण केली आहे. ऋताला तिच्या खऱ्या नवापेक्षा अनेक व्यक्ती फुलपाखरू म्हणूनच ओळखतात.

या मालिकेतील तिची आणि मानसची जोडी खूप गाजली. आजही अनेकांचे हे दोघे फेवरेट कपल आहेत. मात्र तुम्हाला माहीत आहे का? तिने मनोरंजन विश्वात जेव्हा पदार्पण केलं तेव्हा सुरुवातीला तिने अभिनय नाही तर सहायक दिग्दर्शकाची भूमिका बजावली आहे. त्या मालिकेचं नाव आहे पुढचं पाऊल. त्यानंतर २०१३ साली आलेल्या दुर्वा या मालिकेतून तिने अभिनयाला सुरुवात केली. सध्या मन उडू उडू झालं या मालिकेत ती अभिनय करत आहे. तिने अन्याय आणि टाईमपास ३ या चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला आहे. सध्या ती ज्या मालिकेत अभिनय करते तिथे दीपिका हे पात्र देखील ती उत्तमपणे साकारत आहे. भावाच्या लग्नाच्या फोटोसोबत तिने होणाऱ्या पतीसोबतचा एक विडिओ देखील शेअर केला आहे. त्यात “माझा अधिकृत खरा आणि जीवनाचा रील जोडीदार सापडला फक्त ५ दिवस बाकी आहेत.” असंदेखील कॅप्शन तिने दिलेलं आहे. त्यामुळे येत्या ५ दिवसात ती लग्न करणार आहे असं तिच्या चाहत्यांना तिने सुचवलं असल्याचं बोललं जातंय.