“अरे हम गरीब हुये तो क्या हुआ दिलसे अमीर है”, हा डायलॉग जरी कानावर पडला की लगेचच रवी जाधव यांचा टाईमपास हा चित्रपट डोळ्यासमोर उभा राहतो. अशात या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच टाईमपास २ तुम्ही पहिलाच असेल. तर आता या चित्रपटातला आणखीन पुढचा सस्पेन्स पाहण्यासाठी सज्ज व्हा कारण रवी जाधव यांच्यासह अभिनेत्री ऋता दुर्गुळे घेऊन आले आहेत टाईमपास ३. टाईमपास या चित्रपटाचे अनेक डायलॉग आजही शाळा आणि कॉलेजातील मला मुलींच्या तोंडी सहज पाहायला मिळतात. अशात यामध्ये आपण सुरुवातीला लहान मुलांचं प्रेम पाहिलं. दुसऱ्या पार्टमध्ये ते दोघे मोठे झाले आणि त्यांच्या लग्नाची धडपड आपण पहिली.

मात्र आता तिसऱ्या भागात हृताचा रावडी आणि डॅशिंग अंदाज पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचा एक टिजर व्हिडिओ नुकताच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये, “आई बाबा आणि साईबाबा शप्पथ… आणतोय तीच मजा, तोच टाईमपास एका वेगळ्या अंदाजात…. पाहा दगडू आणि पालवीच्या गोष्टीची झलक, ‘टाईमपास ३’ लवकरच….” टिजर प्रदर्शित झाल्यापासून यामध्ये पालवी हे नवीन पात्र दिसत आहे. पालवी हे मुख्य पात्र हृता साकारणार आहे. टिजरमध्ये शाकाल, दगडू ही पात्र देखील दिसत आहेत मात्र प्राजू यामध्ये दिसत नाहीये त्यामुळे टाईमपास ३ मध्ये ती असणार की नाही. तसेच मलेरिया, कोंबडा, बालभारती ही पात्र देखील चित्रपटात असणार आहेत का? असे अनेक प्रश्न आता चाहत्यांना पडले आहेत. रवी जाधव यांच्या दिग्दर्शनात सुरू असलेल्या या चित्रपटात आता पर्यंत आपण “चला हवा येऊ द्या, आई बाबा आणि साईबाबांची शप्पत, कभी आपने बाप से पूछा है काय आयदी.” असे अनेक मजेशीर डायलॉग ऐकले अशात या तिसऱ्या भागात देखील एक जबरदस्त डायलॉग हृताला म्हणजेच पालवीला दिला गेला आहे.
टिजरमध्ये तिच्या एंट्रीलाच “आशी पालवी जी फुटत नाही फोडते, आपल्या दोस्ताला जो नडेल त्याचा आपण मर्बल फोडेल” असे डायलॉग देण्यात आले आहेत. अशात अभिनेत्री हृता दूर्गुळेचा असा अंदाज पहिल्यांदाच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तिने आता पर्यंत सोजवळ आणि सध्या भूमिका केल्या आहेत. मात्र आता टाईमपास ३ मध्ये तिची सुरुवातच मारामारी पासून होताना दिसत आहे. तिने २०१३ साली दुर्वा या मालिकेतून छोट्या पडद्यावर आगमन केलं. त्यानंतर फुलपाखरू आणि मन उडू उडू झालं या मालिकांनी ती चांगलीच प्रकाश झोतात आली. लवकरच ती टाईमपास ३ सह अनन्या या चित्रपटात देखील दिसणार आहे. आता रवी जाधव हे या चित्रपटातून नेमकी कोणती कहाणी घेऊन येतायत हे पाहण हे औत्सुक्याच ठरल आहे.